एक्स्प्लोर

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द, बालसुधारगृहात रहावे लागणार; बाल न्याय मंडळाचा मोठा निर्णय

Pune Porsche Car Accident : हा मुलगा सज्ञान आहे की नाही हे पोलिसांनी तपासावं, त्यानंतर खटला चालवण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल असं बाल न्याय मंडळाने म्हटलं आहे.

Pune Porsche Car Accident :  पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याला आता बालसुधारगृहात राहावं लागणार आहे. दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीने दोघांचा जीव घेतला होता. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला आहे. अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही हे पोलिस ठरवतील असंही बाल न्याय मंडळाने म्हटलं आहे. 

दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवत दोघांचा जीव घेतल्यानंतर अवघ्या 15 तासांमध्येच त्या अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला होता. त्यामुळे नागरिकांतून एक प्रकारची नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पोलिसांनी त्याच्यावर पुन्हा नवीन कलम लावलं आणि त्याचा जामीन रद्द करावा अशी मागणी केली होती.  त्यानंतर आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला. 

बुधवारी सकाळी पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला कोर्टात हजर केलं. त्यावेळी युक्तीवाद करत असताना पोलिसांनी मुलगा दारु प्यायला होता हे न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अल्पवयीन मुलाने कोझी किचन हॉटेलमध्ये भरलेलं 48 हजार रुपयांचे बीलही कोर्टासमोर सादर केलं. तर तिकडे बचावपक्षाच्या वकिलांनी मुलगा अल्पवयीन असल्याचा युक्तीवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तीवाद झाल्यानंतर न्यायलायनं आदेश दिला. 

हा मुलगा अल्पवयीन असल्याचं आरोपीच्या वतीने युक्तीवाद केला. तर या आरोपीने केलेलं कृत्य हे अत्यंत भीषण असं आहे, त्यामुळे त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांच्या वतीनं करण्यात आली. 

पोलिसांनी नव्या कलमाची वाढ केली

पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात पोलिसांनी नव्या कलमाची वाढ केली आहे. त्यानंतर अल्पवयीन आरोपी मुलाने कोर्टात हजेरी लावली आहे. 

मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याप्रकरणी अल्पवयीन मुलावर 185 कलमाच्या अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला. याआधी त्याच्यावर कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अल्पवयीन असल्याच्या कारणावरुन न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. या मुलाला दुपारी 12 वाजता बाल हक्क कोर्टासमोर हजर करण्यात आले. तर 
आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल यांना अटक करण्यात आली असून त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

अल्पवयीन आरोपीची केवळ 15 तासांच्या आत जामीनावर सुटका झाल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP MajhaMedha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!NEET Exam Scam : 'माझा'च्या प्रतिनिधीला 'नीट'चा आरोपी गंगाधरक़डून धमकावण्याचा प्रयत्नMaharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
Ahmednagar MLA List : विखे की थोरात, अहमदनगरमध्ये कुणाचं वर्चस्व? पाहा आमदारांची संपूर्ण यादी
Ahmednagar MLA List : विखे की थोरात, अहमदनगरमध्ये कुणाचं वर्चस्व? पाहा आमदारांची संपूर्ण यादी
Embed widget