मुलगी अपशकुनी असल्याच्या संशयावरुन पित्यानेच मुलीचा घातपात केल्याचा संशय, गाडलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन
जळगाव शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगी अपशकुनी असल्याच्या संशयावरून पित्यानेच मुलीचा घातपात केल्याचा संशय आहे.या प्रकरणी मृत मुलीच्या मामाच्या तक्रारीवरुन गाडलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
![मुलगी अपशकुनी असल्याच्या संशयावरुन पित्यानेच मुलीचा घातपात केल्याचा संशय, गाडलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन In Jalgaon, it is suspected that the father killed his daughter मुलगी अपशकुनी असल्याच्या संशयावरुन पित्यानेच मुलीचा घातपात केल्याचा संशय, गाडलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/28/0ce288bff4cdc9fb8492250ec4f9dfcc_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जळगाव : मुलगी अपशकुनी असल्याच्या संशयावरून बापानेच आपल्या मुलीचा घातपात केला असण्याची तक्रार मामाने पोलिसात दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मृत मुलीचा मृतदेह कब्रस्तानातून बाहेर काढत त्याचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला असल्याने खळबळ उडाली आहे.
जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको येथे राहणाऱ्या जावेद शेख यांच्या कनीज शेख या अकरा वर्षीय मुलीचा तेवीस एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. या मृत्यूनंतर तिचा दफनविधीही करण्यात आला होता. मात्र, या घटनेनंतर तिचे मामा अझहर शौकत अली यांनी जळगाव शहरातील रामानंद पोलिसात तक्रार अर्ज देत मुलीचे वडील कनीज हीचा अशुभ समजून द्वेष करीत असल्याने त्यांनीच तिचा घातपात केला असल्याचा संशय व्यक्त केला.
या तक्रारअर्जाची दखल घेत पोलिसांनी आज पिंप्राळा हुडको परिसरात असलेल्या कब्रस्तान मधून तिचा मृतदेह बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला आहे. या शवविच्छेदनानंतर जो अहवाल येईल त्यानुसार पोलीस कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
कनीजच्या जन्मानंतर तिच्या आईला मुलीचं जन्माला आल्याने तिचे वडील तिचा द्वेष करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर कनीजचा खरच काही घातपात झाला आहे की अन्य कारणाने तिचा मृत्य झाला आहे, याचा आता पोलिस तपास करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)