‘मला तुझी गरज नाही, तू मर जा’.. असं प्रेयसीने बोलताच तरुणाची फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या
धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी या तरुणाने फेसबुक लाईव्ह करून आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होतं.
कल्याण : ‘मला तुझी गरज नाही, ‘तू मर जा’ अस प्रेयसीने बोलताच एका तरुणाने भावनेच्या भरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणात उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी या तरुणाने फेसबुक लाईव्ह करून आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होतं. हा व्हिडिओ पाहून त्याच्या मित्रांनी त्याच्या घरी धाव घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता या तरुणाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली होती.
अंकुश पवार असे या तरुणाचं नाव असून तो कल्याण पश्चिम बेतुरकर पाडा येथील साईकृपा इमारतीमध्ये राहत होता. मूळचा जालन्याचा असलेला अंकुश चार वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात कल्याण आला होता. एका खाजगी रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून तो काम करत होता. या दरम्यान त्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले मात्र काही कारणामुळे या दोघांमध्ये वाद झाले होते. याच रागातून प्रेयसीने त्याला सुनावले त्यामुळे दुःखी झालेल्या अंकुशने गुरुवारी सकाळी साडे सातच्या सुमारास काही मिनिटांत फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या केली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.