Gondia Crime News : आधी दारू पाजली, नंतर शेतात नेत जेवणाचा बेत आखला; अनैतिक संबंधाच्या कारणातून मित्रानेच मित्राला निर्घृणपणे संपवलं
Gondia Crime News : गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सावंगी-पदमपुर शेतशिवरात आज सकाळच्या सुमारास अर्धवट गळा कापलेल्या (Crime News) अवस्थेमध्ये मृतदेह आढळलेला होता.

Gondia Crime News : गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सावंगी-पदमपुर शेतशिवरात आज सकाळच्या सुमारास अर्धवट गळा कापलेल्या (Crime News) अवस्थेमध्ये मृतदेह आढळलेला होता. याप्रकरणी आमगाव पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. श्रवण सोनवणे (25) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलीस करत आहे.
अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची पोलिसांची माहिती
पुढे आलेल्या माहितीनुसार, मृतक नरेश चौधरी आणि आरोपी श्रवण सोनवणे हे दोघेही एकाच गावातील रहिवासी असून काल रात्रीच्या सुमारास दोघेही आमगावला गेले. तिथून दोघांनीही दारू घेऊन पदमपूर शेतशिवारामध्ये जेवण करण्याचा बेत आखला. दोघांनी मद्यप्राशन केले त्यानंतर आरोपी श्रवण याने नरेश याच्यावर धारधार कोयत्याने वार केले. यातच नरेश याचा मृत्यू झाला. आज सकाळी नरेशचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपी श्रवण सोनवणे याला अटक केली आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेचा पुढील तपास आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे व पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
14 वर्षीय अल्पयीन मुलाचं अपहरण 60 लाखांच्या खंडणीची पत्रातून मागणी
वाशिमच्या बाभूळगाव येथील अनिकेत साधुडे या 14 वर्षीय अल्पयीन मुलाचं अपहरण झाल्याची घटना रात्री उशिरा समोर आलीय. गावात रात्री नांनमुखाच्या कार्यक्रमा दरम्यान अनिकेत dj वर नाचण्यासाठी गेला, त्यानंतर तो घरी परतला नसल्याने साधुडे यांच्या कुटुंबीयांनी वाशिम पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवत अनिकेतच्या शोधार्थ 9 पोलीस पथक रवाना केलीय. घटनास्थळी डॉग स्कॉड पाचारण करत गावात तगडा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय. अनिकेतच्या घराबाहेर एक बंद लिफाफ्यात 5 पाणी पत्र लिहत 60 लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली असून पोलिसांना माहिती देऊ नका, अस या पत्रात उल्लेख केला आहे. दरम्यान, आज सकाळपासून पोलीस यंत्रणा अनिकेतसह आरोपीच्या बद्दलची माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
