(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Extortion Case: वसुली प्रकरणी यूपीतून एकाला अटक, डीसीपी सौरभ त्रिपाठी अद्यापही फरार
Saurabh Tripathi: मुंबई गुन्हे शाखेच्या सीआययू टीमने उत्तर प्रदेशमधील लखनौ येथून एका व्यक्तीला अटक केली आहे.
Saurabh Tripathi: मुंबई गुन्हे शाखेच्या सीआययू टीमने उत्तर प्रदेशमधील लखनौ येथून एका व्यक्तीला अटक केली आहे. हीच ती व्यक्ती आहे, ज्याच्यामाध्यमातून डीसीपी सौरभ त्रिपाठी यांना वसुलीची रक्कम पाठवण्यात येत होती, असा दावा गुन्हे शाखेने केला आहे. सौरभ त्रिपाठी हे देखील उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील रहिवासी आहेत. डीसीपी त्रिपाठी हे अंगडियाकडून घेतलेली रक्कम हवालाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशात पाठवत होते.
अंगडियाकडून वसुली प्रकरणात गुन्हे शाखेने आतापर्यंत एकूण 4 आरोपींना अटक केली असून त्यापैकी 3 पोलीस अधिकारी आहेत. याच दरम्यान अटकेनंतर पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांची झालेल्या पोलीस चौकशीतून सौरभ त्रिपाठी यांचे नाव बाहेर आले. त्यानंतर सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासूनच सौरभ त्रिपाठी बेपत्ता आहेत. त्यांना गुन्हे शाखेने 16 मार्च रोजी फरार म्हणून घोषित केले आहे. या प्रकरणाच्या तपासणीसाठी एकूण 5 पथके तयार करण्यात आली आहेत. जे वेगवेगळ्या अँगलने या प्रकरणी तपास करत आहेत.
दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी ओम वंगाटे याची पोलीस कोठडी शनिवारी संपली असून काल आरोपी वंगाटे यांना न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याच दरम्यान, शनिवारी सौरभ त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. अटकपूर्व जामीन अर्जात त्यांनी म्हटले आहे की, यापूर्वी एफआयआरमध्ये त्यांचे नाव नमूद करण्यात आले नव्हते. पोलीस स्टेशन स्तरावर अंगडियाकडून पैसे वसूल केले जात असल्याची माहितीही त्यांना नव्हती. त्यांच्या जामीन अर्जावर 23 तारखेला सुनावणी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: