एक्स्प्लोर

EVM Machine Theft : मोठी बातमी! तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला, कंट्रोल युनिट लंपास; अवघ्या 24 तासांत चोरट्यांना अटक

Pune News : पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिटची चोरी  झाली आहे. सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत.

EVM Machine Control Unit Theft : ईव्हीएम मशीन (EVM Machine) चोरीला (Theft News) गेल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पुरंदर (Purandar) तालुक्यातील सासवड (Saswad) तहसील कार्यालयातून (Tehsil Office) ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिटची (EVM Machine Control Unit Theft) चोरी झाली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली असून त्याचा व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे.

ईव्हीएम मशीनचं कंट्रोल युनिट चोरीला

सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. याबाबत सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवस शनिवार आणि रविवारी तहसील कार्यालयाला सुट्टी होती. त्यावेळी आरोपींनी संधी साधली आणि ईव्हीएन मशीनचं कंट्रोल युनिट लंपास केलं.

स्ट्राँग रूमचं कुलूप तोडून चोरी

सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्राँग रूमचं कुलूप तोडण्यात आल्याचं आढळून आलं. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीन मधील एक ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरी गेले आहे. ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिट चोरी गेले ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पुरंदर सासवड येथील तहसील कचेरी येथून ईव्हीएम चोरी प्रकरणी पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडून पाहणी केली. पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरीला गेल्यानंतर आज ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी  घटनास्थळाची पाहणी केली आहे. 

सासवड येथील तहसील कार्यालयातून सोमवारी ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरीला गेल्याचे उघड झालं होतं. चोरीला गेलेली मशीन प्रशिक्षणासाठी असल्याचं पुरंदर तहसीलच्यावतीने सांगण्यात आले आहे.

ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट सापडलं

सासवड तहसील कार्यालयातून चोरीला गेलेले ईव्हीएम (EVM) मशीनचे कंट्रोल युनिट सापडलं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासांत 2 चोरट्यांनी याप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना कंट्रोल युनिटसह जेजुरीमधून अटक केली आहे. नेमकी त्यांनी ही चोरी कशासाठी केली याचा तपास सुरू आहे.

पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनची चोरी झाली आहे. सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवारी अशी दोन दिवस तहसील कार्यालयाला सुट्टी होती. सोमवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडण्यात आलेल आढळून आले. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीन मधून एक ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याचं समजताच एकच खळबळ माजली होती.

 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला उच्च न्यायालयाचा पुन्हा दणका, जामीन देण्यास दिला नकार 
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला उच्च न्यायालयाचा पुन्हा दणका, जामीन देण्यास दिला नकार 
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
घरा शेजारी राहणाऱ्या मुलासोबतच्या प्रेमसंबंधाला विरोध, रागाच्या भरात आईनेच संपवलं पोटच्या मुलीला, उल्हासनगर हादरलं 
घरा शेजारी राहणाऱ्या मुलासोबतच्या प्रेमसंबंधाला विरोध, रागाच्या भरात आईनेच संपवलं पोटच्या मुलीला, उल्हासनगर हादरलं 
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
Embed widget