लेकीकडून परतताना ST मध्ये बसले, परळीत ऊसाचा रस प्यायला उतरले; चोरट्यांनी वयोवृद्ध जोडप्याचे 9 लाखांचे दागिने पळवले
घरी गेल्यावर बॅग तपासली असता बॅग मधील लाल पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने दिसले नाहीत.

Crime News: छत्रपती संभाजीनगरहून परळीतील सोनपेठ येथे एसटीने प्रवास करणाऱ्या वयोवृद्ध जोडप्याचे प्रवासादरम्यान 9 लाखांचे दागिने चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माधुरी व त्यांचे पती सूर्यकांत परळकर हे छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या मुलीकडे गेले होते. संभाजीनगर येथून एस.टी. बसने बीडला आले. एसटी बसने प्रवास सुरू असताना त्यांच्या पर्समधील 9 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बीड-पारळी-सोनपेठ मार्गावर एसटी प्रवासादरम्यान घडली आहे. या दागिन्यांमध्ये नेकलेस,गंठण,मोहनमाळ व बोरमाळ हे दागिने लंपास झाल्याचे परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दखल करण्यात आली आहे. (Chhatrapati Sambhajinagar)
नक्की झाले काय?
बीड येथून सोनपेठला जाण्यासाठी बीड - परळी बसने दुपारी 12.000 वा. बीड येथून निघून परळीला दुपारी सव्वा दोन ते आडीच वा.सुमारास बस स्थानकात आले. सोनपेठची बस गेली होती म्हणुन त्यांनी परळी बस स्थानकावर उसाचा रस घेतला व दुपारी 3 वाजताच्या सुमारास परळी - सोनपेठ बसने सोनपेठला गेले. घरी गेल्यावर बॅग तपासली असता बॅग मधील लाल पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने दिसले नाहीत.
या पर्समध्ये 6 तोळे वजन असलेले 3 लाख रूपयाची एक मोहन माळ, 6 तोळे वजन असलेले 3 लाख रुपयांचे एक सोन्याची गंठण,चार तोळे वजनाचा 2 लाख रुपयांचा एक लाल खडा असलेला नेकलेस आणि दोन तोळे वजनाची 1 लाख रुपयांची जुनी बोरमाळ असे एकुण 9 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी माधुरी सुर्यकांत परळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.परळी संभाजीनगर पोलिसांना याबाबत माहिती विचारले असता त्यांनी हा गुन्हा सोनपेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग केल्याची माहिती दिली. सध्या सोन्याचा भाव 96 हजारांच्या घरात गेला आहे.
हेही वाचा:


















