Maharashtra Live blog: 'कर्जमाफीत कटकारस्थान झाल्यास कोणालाही सोडणार नाही', बच्चू कडूंचा सरकारला इशारा
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog updates: गोरगरिबांच्या जमिनी अल्पदरात लाटून बच्चू कडू यांनी अमरावतीच्या परतवाडा-चांदूरबाजार रोडवर पूर्णा नदी काठावर कुरळपूर्णा येथे 72 एकराच्या जागेवर स्वतःचे निवासस्थान, फार्महाऊस विविध सुखसुविधा असलेल्या वास्तू उभारल्या आहेत. या हवामहालासाठी गोरगरिबांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावल्याचा गंभीर आरोप प्रवीण तायडे (Pravin Tayde) यांनी केला. भाजप आमदार प्रवीण तायडेंचा पुन्हा बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर खळबळजनक आरोप. समाजसेवेचा बुरखा पांघरून 72 एकर परिसरात खंडणीच्या पैशातून उभारलेल्या माजी आमदार बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, प्रवीण तायडेंची मागणी.
रायगडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; शेतकऱ्यांची पुन्हा तारांबळ
रायगड : जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, अलिबाग, मुरूड आणि रोहा परिसरात मुसळधार सरींना सुरुवात झाली आहे. हिवाळ्याच्या उंबरठ्यावर पाऊस सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवडाभरापासून सुरू असलेला हा अवकाळी पाऊस भातपिकांवर मोठं संकट बनला आहे. हातातोंडाशी आलेली पिकं पावसामुळे खराब होण्याची शक्यता वाढली असून, शेतकरी राजा हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. रायगडकरांची अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा तारांबळ उडाली आहे.
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी संभाजीनगरमध्ये बैठक; शासनाला 9 हजार 700 कोटींचा प्रस्ताव
छत्रपती संभाजीनगर: नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आज छत्रपती संभाजी नगर मध्ये पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत राजकीय नेत्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडली. या कुंभमेळ्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यावर देखील भार पडणार आहे. त्या संदर्भात चर्चा झाली असून शासनाला 9700 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी दिली.























