'थर्टी फर्स्ट'च्या आधीच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका; छत्रपती संभाजीनगरात दारुचा कारखाना उद्ध्वस्त
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरातील मध्यवर्ती भागात छापा टाकत एकूण अदांजे 55 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
छत्रपती संभाजीनगर : उद्या जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत (New Year Celebration) केले जाणार आहे. विशेष म्हणजे यंदाचा 'थर्टी फर्स्ट' रविवारी आल्याने पार्टीसाठी लागणाऱ्या दारूची (Alcohol) आत्तापासूनच सोय केली जात आहे. तर, याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात गावठी हातभट्टीच्या दारूची देखील मोठ्याप्रमाणावर उलाढाल होते असते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने आत्तापासूनच कारवाईचा दणका सुरु केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) शहरातील मध्यवर्ती भागात छापा टाकत एकूण अदांजे 55 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर. के. गुरव यांना गुप्त बातमीदाराकडून शहरातील कुंभारवाडा भागातील दगडगल्ली गुलमंडी येथे गावठी दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी तात्काळ पथकासह माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी गावठी हातभट्टी दारु बनवण्याकरीता लागणारे साहित्य, रसायण, गावठी हातभट्टीची दारु मिळून आली. तसेच, याचवेळी आरोपी शंकर नारायण आचार्य (वय 83 वर्ष, रा. कुंभारवाडा दगडगल्ली गुलमंडी ता. जि. छत्रपती संभाजीनगर) गावठी हातभट्टीची दारु बनवत असताना मिळून आला. त्यामुळे कारवाईसाठी गेलेल्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या ताब्यातुन गावठी हातभट्टी दारु बनविण्यासाठीचे साहित्य, रसायण व गावठी हातभट्टी दारु असा एकूण अदांजे 55 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल मिळाला आहे. तर, शंकर नारायण आचार्यवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअतंर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
यांनी केली कारवाई...
ही कारवाई निरीक्षक आनंद चौधरी, दुय्यम निरीक्षक जी.बी.इंगळे, बी.आर.वाघमोडे, एस.बी. रोटे, स.दु.नि. प्रविन पुरी, गणेश नागवे, बी.आर.पुरी, तसेच जवान रविंद्र मुरडकर, सचीन पवार शारेक काद्री महीला जवान अश्विनी बोंदर, वाहन चालक शिवशंकर मुपडे, किशोर सुदर्डे यांनी केली आहे. तर, सदर गुन्हयाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक जी.बी. इगंळे हे करत आहेत.
'थर्टी फर्स्ट'च्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री...
'थर्टी फर्स्ट'च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दरवर्षी मोठ्याप्रमाणावर अवैध दारू विक्री होत असते. विशेष म्हणजे आठवडाभरा पूर्वीच यासाठी दारूसाठा आणून ठेवला जातो. देशी दारूपासून तर विदेशी दारूपर्यंत सर्वच दारूंची अवैध विक्री होते. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विशेष पथक यासाठी नियुक्त देखील केले जातात. या पथकाकडून कारवाई देखील होते. मात्र, असे असलं तरीही चोरट्या मार्गाने 'थर्टी फर्स्ट'च्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री होत असल्याचे चित्र पाहायला मिळतेच.
इतर महत्वाच्या बातम्या:
थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत पार्टी करताय.. एक दिवसाचा दारू पिण्याचा परवाना काढलाय का?