Crime News : धक्कादायक! फोटो स्टुडिओमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Crime News : फोटो स्टुडिओमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
Crime News : एक अल्पवयीन मुलगी फोटो काढण्यासाठी आली असता तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. बीडमधील धारूरमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार आहेत.
सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत पाच ते सहा वेळा फोटो स्टुडिओत अत्याचार घडला असल्याचे पीडीत मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी मधुर बाळासाहेब फरतडे व सहदेव चाळक या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 376, 504 व पॉस्को कायद्यातील कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धारूर शहरातील एक अल्पवयीन मुलगी नरसिंह फोटो स्टुडिओ येथे पासपोर्ट फोटो काढण्यासाठी आली. आरोपीने फोटो काढून लगेच न देता दुसऱ्या दिवशी फोटो घेऊन जाण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी मुलगी आली असता तिला स्टुडिओत बसवून घेतले. यावेळी एक जण बाहेर काम आहे म्हणून गेला. त्यावेळी दुकानात एक मुलगा व मुलगी असे दोघेच होते. यावेळी आरोपीने अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध प्रस्थापित करुन कोणाला सांगितले तर तुझ्या भावाला ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली असल्याचे पीडितीने तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून दोघांविरुद्ध धारुर पोलीस ठाण्यात पोस्को ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू असून धारूर पोलीस अधिक तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Odisha : पठ्ठ्यानं केलं 7 राज्यातील 14 महिलांशी लग्न ; शेवटच्या बायकोनं पकडलं अन्....
- Crime News : भाऊ झाला वैरी! 17 वर्षीय युवकाची चुलत भावाने केली हत्या
- प्रेमप्रकरणातून पेट्रोल टाकून जाळलं! नाशिकमधील 'त्या' तरुणाची मृत्यूची झुंज संपली; मुलीसह कुटुंबियांवर गुन्हा दाखल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha