Crime News : भाऊ झाला वैरी! 17 वर्षीय युवकाची चुलत भावाने केली हत्या
Parbhani Crime News : एका वादातून मोठ्या भावानेच लहान भावाची हत्या केली असल्याचे समोर आले आहे.
Parbhani Crime News : परभणी शहराला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. एका वादातून 24 वर्षीय युवकाने आपल्या 17 वर्षीय चुलत भावाची निर्घुण हत्या केली असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
परभणी शहरातील रामेश्वर प्लॉट भागात ही घटना घडली. दीपक मिरासे आणि त्यांचा चुलत भाऊ दत्ता मिरासे यांच्यात रविवारी संध्याकाळी साडे आठच्या सुमारास बाचाबाची झाली. या वादाचे रुपांतर भांडणात झाले. विकोपाला गेलेल्या वादातून 24 वर्षीय मोठा चुलत भाऊ दीपक मिरासे याने आपला 17 वर्षीय लहान भाऊ दत्ता याच्या डोक्यात फरशी घातली. या हल्ल्याने दत्ता मिरासे जागेवरच कोसळला. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने दत्ताचा जागीच मृत्यू झाला असल्याचे म्हटले जाते. या घटनेनंतर आरोपी दीपक मिरासे याने घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश कुमार, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शिवाय मयताचे शव उत्तरीय तपासणी साठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवली जिथे मयत दत्ता याच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान पोलिसांकडून आरोपी दीपक मिरासे याचा शोध सुरू आहे. नेमक्या कोणत्या कारणांवरून ही भांडणे झाली, याबाबत माहिती समोर आली नाही. पोलिसांकडून या घटने प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Mumbai Crime : वारंवार पैसे मागत असल्यामुळं नातवाला आला राग, बांबूनं मारहाण केल्यानं आजोबाचा मृत्यू
- धक्कादायक! पत्नीवर हल्ला करणाऱ्या पतीचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न
- प्रेमप्रकरणातून पेट्रोल टाकून जाळलं! नाशिकमधील 'त्या' तरुणाची मृत्यूची झुंज संपली; मुलीसह कुटुंबियांवर गुन्हा दाखल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha