खर्ऱ्याची 3 हजार उधारी दिली नाही म्हणून अल्पवयीन मुलीवर 4 महिने अत्याचार, गर्भवती राहिल्याने प्रकरण उजेडात; चंद्रपुरात खळबळ!
Chandrapur Minor Abuse : चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खर्ऱ्याची तीन हजार रुपये उधारी दिली नाही म्हणून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करण्यात आला.
चंद्रपूर : बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींवर सफाई कामगारानेच लैंगिक अत्याचार केल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात खळबळ उडाली. या घनटेनंतर राज्यात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर, सातारा, नाशिक, पुणे अशा महत्त्वाच्या आणि मोठ्या जिल्ह्यांतूनही अल्पवयीन मुली, महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणं समोर आली. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या या प्रकरणांचा निषेध म्हणून विरोधकांनीही संपूर्ण राज्यभर आंदोलन केले. दरम्यान, आता चंद्रपूर जिल्ह्यातून अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराची आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे.
खर्ऱ्याची उधारी वसूल करण्यासाठी लैंगिक अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार खर्ऱ्याची उधारी वसूल करण्यासाठी चंद्रपूरमध्ये एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करण्यात आलं आहे. चंद्रपूर शहरातील दुर्गापूर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या लैंगिक शोषणातून पीडित मुली गर्भवती झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.
मुलगी खर्रा खरेदी करण्यासाठी यायची
या प्रकरणआत दुर्गापूर पोलिसांनी आरोपी बबन रोहणकर (52) या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी बबन रोहणकर याचा दुर्गापूर भागात एक पानठेला आहे. याच पानाच्या ठेल्यावर पीडित 16 वर्षीय मुलगी खर्रा खरेदी करण्यासाठी यायची.
चार महिन्यांपासून लैंगिक शोषण, मुलगी गर्भवती
पीडित मुलगी आरोपी बबन रोहणकर याच्याकडून उधारीने खर्रा घ्यायची. तिची खर्ऱ्याची उधारी तीन हजार रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर ही उधारी फेडण्यासाठी रोहणकर पीडित मुलीकडे तगादा लावत होता. मात्र ही मुलगी उधारी फेडू शकली नाही. परिणामी आरोपी बबन रोहणकर या पीडित अल्पवयीन मुलीचे गेल्या 4 महिन्यांपासून शोषण करत होता. याच शारीरिक शोषणातून पीडित मुलगी झाली. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.
पोक्सो, ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
हा घृणास्पद प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सध्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीविरोधात कलम 376, पोक्सो, ॲट्रॉसिटी कायदा असे वेगवेगळे कलम आणि कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :