Parth Pawar Land Scam: व्यवहारात अनियमितता, कंपनीकडून खोटे कागदपत्र दाखल; पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी IGR ची खळबळजनक माहिती
Parth Pawar Land Scam : . या व्यवहारात अनियमितता झालेली आहे. मुळशी हवेली हा टेक्निकल विषय आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र देण्यात आला आहे. या कंपनीकडून काही खोटे कागदपत्र देण्यात आले आहेत.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ (Parth Pawar) पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून १,८०० कोटींचे बाजारभाव असणारी जमीन केवळ ३०० कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. या खरेदी व्यवहारात शासनाची १५२ कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खरेदी व्यवहारात केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. यात सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले आहे. यावरून राजकीय राळ उठली असून, अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्ष करत आहेत. याप्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या प्रकरणी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक (जॉइंट आयजीआर) राजेंद्र मुठे यांनी याप्रकरणी एबीपी माझाशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.
Parth Pawar Land Scam : जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई होईल
मुंढवा जमिनीवर प्रकरणात मुद्रांक शुल्क चुकवण्यात आला आहे. मुद्रांक शुल्क विभागाने एक समिती माझ्या अध्यक्षेखाली बनवली आहे. सात दिवसात या समितीचा अवहाल देण्यात येणार आहे. खोटे कागदपत्र तयार करून ज्यांनी फसवणूक केली आहे त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवले जात आहेत. गुन्हा नोंद करण्यासाठी पत्र दिले आहे. तत्कालीन सब रजिस्टर रवींद्र तारु आहेत, त्यांना निलंबित केलं आहे. यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई होईल. 2023 च्या उद्योग विभागाच्या धोरणानुसार याच्यामध्ये डेटा सेंटरसाठी आयटीसाठी मुद्रांक शुल्कमध्ये सूट दिलेली आहे. कंपनीने लेटर दिलं होतं, आता याबाबत इंडस्ट्री डिपारमेंटकडून स्पष्टीकरण घेण्यात येईल, त्यानुसार 5% ड्युटी आहे ती त्यांना माफ होऊ शकते का याचा तपास केला जाईल, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक (जॉइंट आयजीआर) राजेंद्र मुठे यांनी दिली आहे.
Parth Pawar Land Scam : व्यवहारात अनियमितता झालेली आहे
मेट्रोसिस आणि एलबीटी सेस हा वसूल केला नाही, याबाबत नोटीस देण्यात आली आहे. 6 कोटी भरले नाहीत. व्यवहार करताना जो मुद्रांक चुकवला आहे त्याबाबत चौकशी करण्यातील येईल. या व्यवहारात अनियमितता झालेली आहे. मुळशी हवेली हा टेक्निकल विषय आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र देण्यात आला आहे. या कंपनीकडून काही खोटे कागदपत्र देण्यात आले आहेत त्यामुळे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती देखील नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक (जॉइंट आयजीआर) राजेंद्र मुठे यांनी दिली आहे.
Parth Pawar Land Scam : बोटेनीकल गार्डनची जमीन अमेडा कंपनीला देण्यासाठी संगनमत केल्याचा आरोप
मुंढवा जमीन प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार सुर्यकांत येवले, दिग्वीजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्या विरोधात पहाटे पुण्यातील खडकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बोटेनीकल गार्डनची जमीन अमेडा कंपनीला देण्यासाठी संगनमत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रांत अधिकाऱ्यांनी तक्रार दिली आहे.
























