(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolkata Doctor Case :'वाट्टेल तसं ओरबाडून...,'महाराष्ट्राला हसवणाऱ्या अभिनेत्रीच्या शब्दांनी डोळ्यात पाणी; कोलकाता बलात्कार प्रकरणावर अभिनेत्रीची पोस्ट
Kolkata Doctor Case : कोलाकातामध्ये झालेल्या निर्भया हत्याकांडावर मराठी अभिनेत्रीने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आलेली आहे.
Kolkata Doctor Case : कोलकातामध्ये (Kolkata) 9 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला. कोलकाता मधील आरजी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी (PGT) डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची निर्दयी घटना घडली. त्यानंतर देशात एकच संतापाची लाट उसळली. सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट लिहून निषेधही व्यक्त करण्यात येत आहे. यावर आता एका मराठी अभिनेत्रीची (Marathi Actress) पोस्ट चर्चेत आली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर हिने यावर पोस्ट लिहित तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच तिने यावर रेस्ट इन पीस माणुसकी, असं कॅप्शनही दिलं आहे. आजही देशातल्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरच असल्याचं वास्तव कोलकाता येथील घटनेमुळे समोर आलंय. त्यामुळे देशभरातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहेच, पण दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणीही जोर धरतेय.
रसिकाची पोस्ट काय?
रसिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक कविता शेअर केली आहे. त्यामध्ये तिने म्हटलं की, सगळं भान तिने जपायंच,
मुलगी म्हणून स्वतःला सावरायचं, नीट बसायचं, मोठ्याने नाही हसायचं
चारचौघात कमी बोलायचं, लोक नावं ठेवतील, हे सतत ध्यानात ठेवायचं
थोडक्यात स्वतःसाठी नाहीच जगायच, सुंदर, सुडौल दिसायचं
जमत असेल, झेपत नसेल तरी डाएट, एक्सरसाइज अंगी बाळगायचं
नाहीतर लग्नाच्या मार्केटमध्ये कुणी पसंत करायचं??
थोडक्यात मुलगी म्हणून स्वतःला सिद्ध करायचं!!
शिकायचं, खेळायचं, नाचायचं, गायचं सर्वगुणसंपन्न व्हायचं...
स्वयंपाकात पारंगत व्हायचं, मॅरेज मटेरियलल व्हायचं
संस्कारी, संसारी व्हायचं, हार्मोनल इमबॅलन्सला कुरवाळाचं
सेव्हिंग इन्व्हेस्टमेंटचं ज्ञान ठेवत हातात वाइन ग्लास घेऊन अपडेटेड पण राहायचं
आणि अरे मुलगी ड्राइव्ह करत असणार असं म्हणून तुम्ही तिला डिग्रेड करायचं
डॉक्टर, अॅक्टर, इन्स्पेक्टर सगळीकडे तिने बरोबरीने उभे राहायचं
सरते शेवटी घरी येऊन तिनेच राबायचं, सुंदर सुडौल म्हणत दिसण्याचं भान तिने जपायचं
नाही तर छछोर, बाहेर ख्याली विशेषण तिच्या नावामागे लागायचं
एखादी छान हसून, मोकळं ढाकळं बोलली की त्याला तुम्ही आमंत्रण समजायचं
कसे हसायचे, कसे बोलायचे, कसे वागायचे यावर तुम्ही बंधन लावायचं,
प्रत्येक गोष्टीत तुम्ही तिला जज करायचं,सर्वगुणसंपन्न, मॅरिज मटेरियलचं बिरुद तुम्ही तिच्यावर थोपायचं
आणि वाटेल तसं ओरबाडून तुम्ही शेवटी तिलाच लांछन लावायचं
View this post on Instagram
नेमकं काय घडलं?
शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला डॉक्टरचा मृतदेह आढळल्यानंतर कोलकातामध्ये खळबळ उडाली आहे. शासकीय आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या एका 31 वर्षीय पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर गुरुवारी रात्री लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याचा आरोप आहे. चेस्ट मेडिसिन विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये अधिकाऱ्यांनी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. महिला डॉक्टरच्य मृतदेहावर अनेक जखमांच्या खुणा होत्या.