Twinkle Khanna : '...कदाचित तू परत कधीच येणार नाहीस', कोलकाता बलात्कार प्रकरणानंतर ट्विंकल खन्ना लेकीला म्हणाली...
Twinkle Khanna : बॉलीवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने कोलकाता प्रकरणावर संतप्त पोस्ट केली आहे.
Twinkle Khanna : कोलकातामध्ये (Kolkata Case) झालेल्या निर्भया कांडवर बॉलीवूडमधूनही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. त्यावर आता बॉलीवूड ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिने केलेली पोस्टही सध्या चर्चेत आलेली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अजूनही या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. 9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी (PGT) डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. याच घटनेचा संपूर्ण देशाने निषेध केला.
ट्विंकल खन्नानेही तिच्या लेकीने दृष्टीने ही पोस्ट केली आहे. तिच्या 11 वर्षीय मुलीसाठी ही पोस्ट ट्विंकलकडून करण्यात आली आहे. याआधी आलिया भट्ट, रिचा चढ्ढा, स्वरा भास्कर या अभिनेत्रींनीही पोस्ट केली होती. 31 वर्षीय महिला डॉक्टरसोबत माणुसकीला काळिमा फासणारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. रुग्णालयाच्या सेमिनॉर हॉलमधेच पीडितेवर आधी बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आली.
ट्विंकल खन्नाची पोस्ट नेमकी काय?
'50 वर्ष या देशात मी माझ्या मुलीला तिच गोष्ट शिकवतेय, जी मला लहान असताना शिकवण्यात आली होती. पार्कमध्ये, शाळेत आणि बीचवर एकटी जाऊ नकोस. कोणत्याही पुरुषासोबत बाहेर एकटी जाऊ नकोस, तुझा काका, भावंड असो किंवा मित्र. सकाळी, दुपारी आणि विशेष करुन रात्री तर बाहेर एकटी जाऊच नकोस. हा जर चा प्रश्न नाही तर हा कधीचा प्रश्न आहे... कदाचित तू बाहेर एकटी गेलीस आणि परत कधीच येऊ शकली नाहीस तर...', असं म्हणत तिरंग्याच्या रंगामध्ये ट्विंकलने ही पोस्ट केली आहे.
— Twinkle Khanna (@mrsfunnybones) August 15, 2024
नेमकं काय घडलं?
शुक्रवारी हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला डॉक्टरचा मृतदेह आढळल्यानंतर कोलकातामध्ये खळबळ उडाली आहे. शासकीय आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या एका 31 वर्षीय पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर गुरुवारी रात्री लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याचा आरोप आहे. चेस्ट मेडिसिन विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये अधिकाऱ्यांनी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. महिला डॉक्टरच्य मृतदेहावर अनेक जखमांच्या खुणा होत्या.
महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या झाल्याचं उघडकीस आलं. वाढत्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की, जर पोलिसांनी रविवारपर्यंत या प्रकरणाची उकल केली नाही तर ते हे प्रकरण सीबीआयकडे सोपवतील.