एक्स्प्लोर

Beed Police: बीडमध्ये पोलिसांसाठी आदेश, आडनाव घ्यायचं नाही, नावाने हाक मारायची; पोलीस अधीक्षक नवनीत कावतांनी फर्मान सोडलं

Beed News: बीड जिल्ह्यात जातीय तणाव, मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष सातत्याने होताना दिसत आहे. बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांचा महत्त्वाचा आदेश.

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीपासून मराठी विरुद्ध वंजारी हा सुरु झालेला वाद देशमुख हत्याप्रकरणानंतर आणखी उफाळला होता. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा आणि सौहार्द नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बीड जिल्ह्यातील सराकरी अधिकारी, पोलीस प्रशासन अशा सगळ्यांनाच या जातीयवादाचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवनीत कावत यांनी मंगळवारी एक महत्त्वाचा आदेश जारी केला.  त्यानुसार आता बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारणे बंधनकारक करण्यात आले आहे.

बीड पोलीस अधीक्षकांना बीड मधील जातीयवाद कमी करण्यासाठी पाऊल उचलले आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एक अनोखा आदेश लागू केला. यापुढे पोलिसांनी एकमेकांना फक्त पहिल्या नावानेच बोलवायचे, आडनाव घ्यायचे नाही, असे आदेशात म्हटले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे जातीय वातावरण ढवळून निघाले आहे. पोलिस खात्यात एकाच जातीचे कर्मचारी असून ते आरोपींना सहकार्य करत असल्याचाही आरोप झाला. त्यामुळे जातीय भेदभाव नष्ट करण्यासाठी हा आदेश लागू केला आहे. या आदेशाचे आता बीड जिल्ह्यात काय पडसाद उमटतात, हे पाहावे लागेल.

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात लक्षणीयरित्या दिसून आला होता. या आंदोलनाच्या काळात बीडमध्ये काही आंदोलकांनी जाळपोळ केली होती. त्यानंतर  लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध वंजारी असे जातीय ध्रुवीकरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला होता. यानंतर वंजारी समाजात तीव्र पडसाद उमटले होते. विधानसभा निवडणुकीतही हा जातीय वाद पाहायला मिळाला होता. अनेक शाळांमध्ये लहान मुलांमध्येही आपापसात जातीय भेदभाव झाल्याच्या घटना बीड जिल्ह्यात घडल्या होत्या. त्यामुळे बीडमधील सामाजिक परिस्थितीबाबत अनेकांनी शंका व्यक्त केली होती.

बीड पोलीस दलात वाल्मिक कराडच्या मर्जीतील पोलीस अधिकारी

संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांबाबत वाद निर्माण झाले होते. या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी गठित करण्यात आलेल्या विशेष तपास पथकात (एसआयटी) कराडच्या जवळच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप झाला होता. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे एसआयटीतील काही अधिकाऱ्यांना पथकातून बाहेर काढण्यात आले होते. बीडमधील 26 पोलिस अधिकारी वाल्मिक कराडच्या मर्जीतील असून त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी पुण्यातील भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी केली होती.

आणखी वाचा

वाल्मिक कराडला खास ट्रिटमेंट, रुग्णालयाचा वॉर्ड रिकामा केला; रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
Bihar Assembly polls 2025: पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Pravin Datke : दुबार मतदार, 'वोट जिहाद'वरून भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार जुंपली
Zero Hour Sachin Sawant : राहुल गांधींच्या मुळ प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तर दिलं नाही
Zero Hour Rahul Gandhi Haryana : 'व्होटचोरी' नंतर आता 'सरकारचोरी';राहुल गांधींचा हल्लाबोल
Zero Hour Jayashree Shelke : ठाकरेंनी कर्जमाफी केली, पण फडणवीसांनी फक्त थाप मारली
Zero Hour Anil Bonde : ठाकरेंचा मराठवाडा दौरा राजकीय; भाजपच्या अनिल बोंडेंचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
Bihar Assembly polls 2025: पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
आकाशात सुपरमूनचे दर्शन, 13 टक्के मोठा, 30 टक्के तेजस्वी; पंगांगकर्ते सोमण नेमकं काय म्हणाले?
आकाशात सुपरमूनचे दर्शन, 13 टक्के मोठा, 30 टक्के तेजस्वी; पंगांगकर्ते सोमण नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Tata Bike : टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Embed widget