एक्स्प्लोर

कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा

प्रशासनाला मोकळेपणाने तपास करायचा असेल, तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असंही ते म्हणाले.

Beed : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणाच्या तपासाची चक्रे वेगाने फिरत असले तरी धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde ) राजीनाम्यावरून दबाव वाढत आहे. दरम्यान, संतोष देशमुख प्रकरणातील चौथा आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale) आता जिवंत नसेल असा मला संशय आहे, धनंजय मुंडे यांचा  राजीनामा घेतला शिवाय चौकशी व्यवस्थित होणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते संदीप क्षीरसागर म्हणाले आहेत. प्रशासनाला मोकळेपणाने तपास करायचा असेल, तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असंही ते म्हणाले. पहिल्यांदाच हा विषय बाहेर आला आहे, आणि जर एखाद्या व्यक्तीला पकडायचे ठरवलं तर तो 24 तासात सापडतो; त्यामुळे कृष्णा आंधळे याच्या जीवाशी घातपात झाला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. (Sandeep Kshirsagar)

संतोष देशमुख प्रकरणातला मुख्य आरोपी कुष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या ताब्यात नाही. 2023 मध्येही त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. तरी त्याला अटक झाली नव्हती. मागील चार वर्षांत त्याच्यावर सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने धारूर, आंबाजोगई, आणि केज पोलीस ठाण्यांमध्ये खंडणी, मारामारी, आणि खुनाचे प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे केले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख प्रकरणात आरोपी फरार होतोच कसा त्याला फरार करण्यात कोणाचा हात आहे? असे अनेक सवाल अजूनही अनुत्तरीतच आहेत. (Santosh Deshmukh Case)

काय म्हणाले संदीप क्षीरसागर ?

बीड मधील अनेक प्रकरण समोर येणार आहेत. लोकं स्वतःहून पुढे येऊन बोलत आहेत. संतोष देशमुख प्रकरणातील चौथा आरोपी कृष्णा आंधळे आता जिवंत नसेल असा मला संशय आहे.धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायलाच हवा त्याशिवाय चौकशी व्यवस्थित होणार नाही. बीड जिल्हा शल्य चिकित्सक चुकीच काही करत असतील असं मला अजिबात वाटत नाही.

संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख प्रकरणाबाबत खळबळजनक वक्तव्य करताना कृष्णा आंधळे जिवंत नसेल, असा संशय व्यक्त केला. त्यांनी म्हटलं की, एखादा विषय अंगलट येतो तेव्हा तो माणूस गायब होतो, आणि मला वाटतं नाही की हा माणूस सापडेल. दादाचा स्वभाव असा आहे की चुकीची गोष्ट त्यांना कधीच पटत नाही. याप्रकरणी सरकारने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आदेशावरून एसपीची बदली केली आहे. क्षीरसागर म्हणाले की, गुन्हा नोंदवायला दहा-बारा तास उशीर झाला आणि ज्यांनी हा विलंब केला, त्यांच्यावर डीसीआर मिळाल्यावर कारवाई होईल. लोकांनी स्वतःहून रस्त्यावर उतरून या प्रकरणात आवाज उठवला आहे. अन्याय झालेल्या लोकांनी पुढे येऊन बोलायला सुरुवात केली आहे. प्रशासनाला मोकळेपणाने तपास करायचा असेल, तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असंही ते म्हणाले. पहिल्यांदाच हा विषय बाहेर आला आहे, आणि जर एखाद्या व्यक्तीला पकडायचे ठरवलं तर तो 24 तासात सापडतो; त्यामुळे कृष्णा आंधळे याच्या जीवाशी घातपात झाला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा दबाव वाढला

बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड जरी न्यायालयीन कोठडीत असला तरी त्याच्या संपर्कात असलेले 26 अधिकारी व कर्मचारी त्याचा मर्जीतले असल्याचा खळबळजनक आरोप तृप्ती देसाई यांनी केल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे . या प्रकरणातला  प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याला एसआयटीच्या पुढील तपासासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणातला चौथा आरोपी कृष्णा आंधळे जिवंत असेल की नाही असा संशय असल्याचं संदीप क्षीरसागर म्हणालेत . बीड जिल्हा शल्यचिकित्सक चुकीचं काही करत असतील असं वाटत नाही पण या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नंतरच चौकशी नीट होईल असं क्षीरसागर म्हणालेत .

हेही वाचा:

Ambadas Danve On Walmik Karad: वाल्मिक कराडने 18 दिवस फरार असताना 'ते' महत्त्वाचं काम केलं, अंबादास दानवेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane: आमचं वैयक्तिक आयुष्यही असतं, व्यवसायासाठी घरात पैशांची उलाढाल असेल तर गैर काय? नितेश राणेंच्या स्टिंग ऑपरेनशवर बंधू नितेश राणेंचा प्रतिसवाल
आमचं वैयक्तिक आयुष्यही असतं, व्यवसायासाठी घरात पैशांची उलाढाल असेल तर गैर काय? नितेश राणेंच्या स्टिंग ऑपरेनशवर बंधू नितेश राणेंचा प्रतिसवाल
Pune Crime News: पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
Pune Crime News: फॉर्च्युनरमध्ये व्यवसायिकाचा काटा काढला; पुण्यातील माजी नगरसेवकाचं कनेक्शन समोर आलं, ताम्हिणी घाटात काय घडलं?
फॉर्च्युनरमध्ये व्यवसायिकाचा काटा काढला; पुण्यातील माजी नगरसेवकाचं कनेक्शन समोर आलं, ताम्हिणी घाटात काय घडलं?
‘महावतार नरसिंह’ची ऑस्करच्या रेसमध्ये बाजी; भगवान विष्णूंच्या अवताराची पौराणिक कथा करणार का 5 सिनेमांवर मात?
‘महावतार नरसिंह’ची ऑस्करच्या रेसमध्ये बाजी; भगवान विष्णूंच्या अवताराची पौराणिक कथा करणार का 5 सिनेमांवर मात?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

India Vs South Africa टीम इंडियाचा कसोटीतील मोठा पराभव, द. अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचं काय चुकलं?
Ujjwala Thitte News : आम्ही हायकोर्टात धाव घेऊ, तिथे ही अपयश आलं तर सर्वोच न्यायालयात जाऊ!
Nagpur Road ABP Majha Impact : एबीपी माझा'च्या बातमीनंतर नागपूर रस्त्यासाठी सरकारकडून 80 कोटींचा निधी मंजूर
MVA VS Mahayuti : मविआला ठेंगा, महायुतीसाठी रांगा; मनपा निवडणुकीपर्यंत मविआचं काय होणार? Special Report
Special Report MVA Vs Mahayuti पालिका निवडणुकीपर्यंत मविआचं काय होणार? मविआतून लढलेले अनेक महायुतीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane: आमचं वैयक्तिक आयुष्यही असतं, व्यवसायासाठी घरात पैशांची उलाढाल असेल तर गैर काय? नितेश राणेंच्या स्टिंग ऑपरेनशवर बंधू नितेश राणेंचा प्रतिसवाल
आमचं वैयक्तिक आयुष्यही असतं, व्यवसायासाठी घरात पैशांची उलाढाल असेल तर गैर काय? नितेश राणेंच्या स्टिंग ऑपरेनशवर बंधू नितेश राणेंचा प्रतिसवाल
Pune Crime News: पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
Pune Crime News: फॉर्च्युनरमध्ये व्यवसायिकाचा काटा काढला; पुण्यातील माजी नगरसेवकाचं कनेक्शन समोर आलं, ताम्हिणी घाटात काय घडलं?
फॉर्च्युनरमध्ये व्यवसायिकाचा काटा काढला; पुण्यातील माजी नगरसेवकाचं कनेक्शन समोर आलं, ताम्हिणी घाटात काय घडलं?
‘महावतार नरसिंह’ची ऑस्करच्या रेसमध्ये बाजी; भगवान विष्णूंच्या अवताराची पौराणिक कथा करणार का 5 सिनेमांवर मात?
‘महावतार नरसिंह’ची ऑस्करच्या रेसमध्ये बाजी; भगवान विष्णूंच्या अवताराची पौराणिक कथा करणार का 5 सिनेमांवर मात?
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
Shivsena Vs BJP: अंबरनाथमध्ये शिंदे गट-भाजपमध्ये तुफान राडा,  धमकीनंतर भाजप कार्यकर्त्यावर कोयत्याने हल्ला
अंबरनाथमध्ये शिंदे गट-भाजपमध्ये तुफान राडा, धमकीनंतर भाजप कार्यकर्त्यावर कोयत्याने हल्ला
Smriti Mandhana Palash Muchhal: वडिलांची प्रकृती बिघडली, लग्न पुढे ढकललं; आता स्मृती मानधनानं मोठं पाऊल उचललं
वडिलांची प्रकृती बिघडली, लग्न पुढे ढकललं; आता स्मृती मानधनानं मोठं पाऊल उचललं
Ajit Pawar in Solapur: मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं, प्रत्येकाचा फुगा फुटत असतो; अजित पवारांचा राजन पाटलांवर हल्लाबोल
मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं, प्रत्येकाचा फुगा फुटत असतो; अजित पवारांचा राजन पाटलांवर हल्लाबोल
Embed widget