Mirchi Baba Arrested : बलात्कारप्रकरणी मिर्ची बाबाला अटक, पीडित महिलेचे गंभीर आरोप
Mirchi Baba Arrested : प्रसिद्ध मिर्ची बाबा उर्फ महंत वरग्यानंद गिरी यांना बलात्कारप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Mirchi Baba Arrested : भोपाळचे प्रसिद्ध मिर्ची बाबा उर्फ महंत वरग्यानंद गिरी यांना बलात्कारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. भोपाळमधील एका महिलेने या कथित साधूवर शारीरिक शोषणाचा आरोप केला आहे.
मूल होत नसल्यामुळे पीडित महिलेने जानेवारी महिन्यात वैरागानंद गिरी यांची भेट घेतली होती. त्यावेळी वैराग्यानंद उर्फ मिर्ची बाबा यांनी पीडितेला प्रसाद म्हणून भभूती खायला दिली. भभूती खाल्ल्याबरोबर ती बेशुद्ध झाली आणि त्यानंतर बाबाने तिच्यावर बलात्कार केला. महिला शुद्धीवर आल्यावर तिला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर तिने याप्रकरणी महिला गुन्हे शाखेकडे धाव घेतली, असा आरोप पीडित महिलेने केले आहेत.
महिलेला जीवे मारण्याची धमकी
बाबाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार पीडित महिलेने पोलिसांशी संपर्क साधला आणि आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. वैरागानंद गिरी उर्फ मिर्ची बाबा यांना ही बाब समजताच त्यांनी महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेने सार्वजनिक लज्जेच्या भीतीने त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला नाही. आता हिंमत दाखवत महिलेने आरोपी बाबाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ बाबाविरुद्ध एफआयआर नोंदवून कारवाई सुरू केली.
बाबाला अटक
महिलेच्या तक्रारीवरून बाबाला ग्वाल्हेरमधून अटक करण्यात आली आहे. ग्वाल्हेर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली, त्यावरून रात्री उशिरा मिर्ची बाबाला ताब्यात घेण्यात आले. महिला गुन्हे शाखा आणि गुन्हे शाखेचे संयुक्त पथक ग्वाल्हेरला पोहोचले. जिथून मिर्ची बाबाला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
महिला क्राइम ब्रँचच्या एसीपी निधी सक्सेना यांनी सांगितले की, पीडित महिलेने बाबाविरुद्ध मूल होण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. त्यावर कारवाई करत पोलिसांनी आरोपी बाबाला तत्काळ अटक केली.
दरम्यान, हे प्रकरण खूप गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल अशी माहिती महिला क्राइम ब्रँचच्या एसीपी निधी सक्सेना यांनी दिली आहे. अटक करण्यात आल्यानंतर बाबाची सध्या चौकशी सुरू असून सत्य लवकरच समोर येईल असे देखील सक्सेना यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या