Wardha crime : वर्धा हादरलं, पत्नीने केली पतीची निर्घून हत्या, हात-पाय तोडून जाळले
Wardha crime News : पत्नीने पतीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर हात-पाय तोडून जाळले. शीर पूर्ण जळलं नाही म्हणून रेल्वे परिसरात फेकून दिलं. या घटनेने वर्धा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
Wardha crime News : पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यामध्ये घडली आहे. हत्या केल्यानंतर हात-पाय तोडून जाळले. शीर पूर्ण जळलं नाही म्हणून रेल्वे परिसरात फेकून दिलं. या घटनेने वर्धा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. आरोपी पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अनिल मधुकर बेंदले वय 46 असा मृतकाचं नाव तर मनीषा बेंदले असं आरोपी पत्नीचं नाव आहे.
वर्ध्यातील देवळी तालुक्यातील पुलगाव येथील हिंगणघाट फैल येथील राहणाऱ्या अनिल मधुकर बेंदले वय 46 वर्ष याची शुक्रवारी रात्री पत्नीने हत्या केली व त्याच्या मृतदेहाची तुकडे करून मुलाच्या मदतीने ऑटोमध्ये पुलगाव वरून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मलकापूर बोधड या मूळ गावात नेऊन मृतदेहाचे तुकडे जाळण्यात आले. तर शीर हे पूलगाव रेल्वे परिसरात फेकले. मृतकाचे शिर हे दोन दिवसाअगोदर पुलगावातील रेल्वे स्टेशनच्या बाजूला एका झुडपात आढळले होते. पोलिसांनी तपासचक्र फिरवीत खुनाचा उलघडा केला. खुनामागे पत्नी असल्याचे असल्याचे पुढे आले.
आधी होमगार्डमध्ये करत होता काम:
पूलगावातील हिंगणघाट फैल येथे राहणारा मृतक अनिल हा दारू पिण्याच्या सवयीचा होता. तो आधी होमगार्ड मध्ये काम करत असून, निलंबित झाल्यावर सध्या रोज मजुरीचे काम करायचा. रोज कुटुंबात पारिवारिक वाद होता. पत्नी मनीषा हिने पती अनिलची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून दोन बॅगमध्ये भरले व मुलाला दोनशे रुपयांमध्ये ऑटो भाड्याने करायला सांगितला. या चालकाला याबाबतची काहीही माहिती नव्हती. ऑटोने मृतदेह हा दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मलकापूर बोधड या मूळ गावामध्ये आणून घराचा मोठ्या परिसर असल्यामुळे तेथे जाळला..
आरोपी पत्नी कराटे प्लेयर? :
या घटनेत आरोपी पत्नी ही कराटे प्लेयर असून मृतक हा आधी होमगार्ड मध्ये कार्यरत होता. दोन वर्षांपूर्वी आंदोलनादरम्यान तो निलंबित झाला होता. त्यानंतर तो रोज मजुरी करायचा आणि तो दारू पिण्याचे सवयीचा होता.. म्हाताऱ्या सासऱ्याने बॅगमध्ये काय आहे? असे विचारले असता जुने कपडे जाळायला आणले असे मनीषाने सांगितले. पुलगाव पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला असून मृतकाची पत्नी मनीषा व मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनेचा संपूर्ण तपास, आरोपींची चौकशी झाल्यानंतर हत्या का केली याचा उलगडा होईल..
मृतदेहाचे अवशेष पाठवले फॉरेन्सिकला :
आज 9 ऑगस्ट रोजी पोलिसांनी मृतकाच्या शरीराचे अवशेष ताब्यात घेऊन फॉरेन्सिक लॅब कडे पाठवले. या हत्याकांडाने जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली असून इतक्या क्रूरपणे हत्या झाल्याने एकप्रकारे आश्चर्य व्यक्त होत आहे. उपविभागीय अधिकारी गोकुळसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक शैलेश शेळके राजू हाडके खुशाल पंत राठोड संजय पटले पंकज टाकोने महादेव सानप, शरद सानप पुढील तपास करत आहेत.