भर रात्री थरकाप उडवणारी घटना! 26 वर्षीय तरुणासोबत घडलं असं काही की भंडारा जिल्हा हादरला!
भंडारा जिल्ह्यात एका 26 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे.
भंडारा : जिल्ह्यात अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात (Lakhni Murder) एका 26 वर्षीय तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रकार घडला आहे. भर रात्री हा प्रकार लोकांच्या लक्षात आल्याने येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत हटवार (Shrikant Hatwar) असं मृत तरुणाचं नाव असून अॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (Atrocity Act) त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.
नेमका प्रकार काय?
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील गराडा शेतशिवारात एका तरुणाचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत ढळून आला. या तरुणाचे नावे श्रीकांत हटवार असे असून तो सावरी मुरमाडी इथला रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार या तरुणाची अज्ञातांनी अगोदर हत्या केली. त्यानंतर त्याला जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मात्र या परिसरातील लोकांमुळे आरोपींचा हा प्रयत्न फसला.
लोकांनी घटनास्थळी धाव घेतली अन्...
आरोपींकडून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला जात असताना लोकांच्या लक्षात आले. नेमकं काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र समोर पाहिलेला प्रकार लक्षात येताच त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला. या लोकांनी लगेच लाखनी पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची सविस्तर माहिती दिली. पोलिसांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी अॅट्रॉसिटी प्रकरणात आरोपी
हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. लीस आरोपींचा शोध घेत आहेत. मृत श्रीकांत हा अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (अॅट्रॉसिटी) एका प्रकरणात आरोपी आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
हेही वाचा >>
चिकन घेण्यावरून हिंगोलीत जोरदार राडा, दोन गटात तुफान दगडफेक; घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त