चिकन घेण्यावरून हिंगोलीत जोरदार राडा, दोन गटात तुफान दगडफेक; घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Hingoli Crime News : पोलिसांनी दोन्ही गटाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
![चिकन घेण्यावरून हिंगोलीत जोरदार राडा, दोन गटात तुफान दगडफेक; घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त Hingoli Crime News Two Groups Dispute over taking chicken In Hingoli stone pelting marathi news चिकन घेण्यावरून हिंगोलीत जोरदार राडा, दोन गटात तुफान दगडफेक; घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/30/d9058e2f66a17013ffe8ef07fbd97eb11711769116466737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hingoli Crime News : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात चक्क चिकन (Chicken) घेण्यावरून वाद झाल्याचा प्रकार समोर आला असून, वाद एवढ्या विकोपाला गेला की थेट दोन गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. पाहता पाहता दोन्ही गटाकडून एकमेकांवर थेट दगडफेक करण्यात आल्याने घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहचला. पोलिसांनी दोन्ही गटाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
हिंगोली शहरातील मच्छी मार्केट परिसरामध्ये रात्री दहा वाजेच्या सुमारास चिकन घेण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर भांडणात झाले. हे दोन गट इतक्यावरच थांबले नाहीत, तर यावेळी प्रचंड दगडफेक करण्यात आली. किरकोळ कारणावरून झालेल्या या वादाचे रूपांतर दगडफेकीपर्यंत झाल्याने काही काळ घटनास्थळी भीतीचे वातावरण होते. तर, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात दगडांचा खच सुद्धा पाहायला मिळाला आहे. या प्रकरणाची माहिती हिंगोली पोलिसांना कळताच हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल होते. त्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहेत. उशिरा रात्री याप्रकरणी परस्पर दिलेल्या तक्रारीवरून आठ जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरकोळ कारणावरून वाद पेटला...
हिंगोली शहरातील मच्छी मार्केट परिसरामध्ये शुक्रवारी रात्री दोन गटात वाद झाला. वाद थेट दगडफेकीपर्यंत पोहचला. शेवटी पोलिसांना जमावाला पांगवण्याची वेळ आली. मात्र, हा वाद चिकन घेण्याच्या किरकोळ वादातून झाला असल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच वादाचे नेमेके कारण काय आहे याचा देखील पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळी अजूनही पोलिसांचा काही प्रमाणत बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
धाराशिवमध्ये दोन गटात राडा, दगडफेकीत पाच जखमी; यु ट्यूब चॅनलच्या पत्रकाराने जमाव भडकवल्याचा आरोप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)