एक्स्प्लोर

मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरून लग्नाची मागणी घालून पोलिसाचा महिलेवर अत्याचार

सोलापूर जिल्ह्यात राहणार्‍या घटस्फोटीत महिलेशी लग्नगाठी जुळविणार्‍या संकेतस्थळावरुन लग्नाची मागणी घालीत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

अहमदनगर : सोलापूर जिल्ह्यात राहणार्‍या घटस्फोटीत महिलेशी लग्नगाठी जुळविणार्‍या संकेतस्थळावरुन लग्नाची मागणी घालीत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. लैंगिक अत्याचार, तिच्या दहा वर्षीय मुलीला मारहाण, दमदाटी करणे व बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई सुनील रत्नपारखी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आळेफाटा येथील डॉक्टर आणि अकोल्यातील एका महिलेसह दोघांवर अत्याचार, अ‍ॅट्रोसीटी, बेकायदा गर्भपात व पॉस्कोतंर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पोलीस वर्तुळासह वैद्यकीय व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात राहणार्‍या एका 33 वर्षीय घटस्फोटीत तरुणीने आपल्या पुनर्विवाहासाठी ऑनलाईन लग्नगाठी जुळविणार्‍या संकेतस्थळावर आपल्या नावाची नोंद केली होती. याचवर्षी 11 जानेवारी रोजी घारगाव पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या सुनील रत्नपारखी या कर्मचार्‍याची संकेतस्थळावरील नोंदीवरुन महिलेशी ओळख झाली. संबंधित पोलीस शिपायाने आपणही घटस्फोटीत असून आपणास दोन मुली आहेत व त्या दोघीही आपल्यासोबतच राहतात असे त्या महिलेला सांगीतले. त्यावरुन त्या दोघांचीही लग्नावरुन परस्पर सहमती झाल्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या कर्मचार्‍याने थेट त्या महिलेचे सोलापूर जिल्ह्यातील गाव गाठले. त्यावेळी त्याने सदर महिलेच्या आई व भावांशी चर्चा करुन लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. 17 फेब्रुवारी रोजी सदर महिला सोलापूरहून शिर्डीत आली. संबंधित कर्मचार्‍याने तिला शिर्डीतून थेट घारगावला आणले. त्या दिवशी त्या कर्मचार्‍याला रात्रपाळी असल्याने त्याने त्या महिलेला तिच्या व स्वतःच्या मुलीसह आपल्या घरी ठेवले. त्या संधीचा फायदा घेवून त्याने त्या महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केल्याची फिर्यादीत नोंद करण्यात आली आहे.

त्या दरम्यान त्याने वेळोवेळी लग्नाचे अमिष दाखवित तिच्यावर अत्याचाराचा सिलसिला सुरुच ठेवला. त्यातून तिला गर्भधारणा झाली अखेर त्या पोलीस कर्मचार्‍याचे नातेवाईक असलेले अकोले तालुक्यातील अमोल कर्जुले व त्याची आई यांनी घारगावात येवून गर्भपातासाठी तिच्यावर दबाव आणला. यातून त्या महिलेच्या दहा वर्षीय मुलीलाही मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली असल्याचा फिर्यादीत उल्लेख आहे. दरम्यान या फिर्यादीवरून घारगाब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार झाले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

आरोपी पोलीस शिपाई सुनील रत्नपारखी, आळे येथील निरामय रुग्णालयाचे डॉक्टर व्ही.जी.मेहेर, त्या पोलीस शिपायाचे नातेवाईक अमोल कर्जुले व त्याची आई अशा चौघांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भा.द.वी 376, 376(2)(एन), 313, 354, 354 (ए), 323, 504, 506, 34 प्रमाणे व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे कलम 10 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने पोलीस दलासह वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar NCP Majalgaon : घोषणाबाजी आवरली नाही तर... अजित पवारांचा दमTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Embed widget