Akola News : आरोपीच्या शोधात गेलेल्या वनविभागाच्या पथकावर तुफान दगडफेक; ग्रामस्थांचे गंभीर आरोप
Akola Crime News : अकोल्यातल्या अकोट तालुक्यात आरोपीच्या शोधात गेलेल्या अंजनगावच्या वनविभागाच्या पथकावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.
Akola News अकोला : अकोल्यातल्या अकोट तालुक्यात आरोपीच्या शोधात गेलेल्या अंजनगावच्या वनविभागाच्या पथकावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या दरम्यान वनविभागाच्या वाहनावर देखील दगडफेक झाली आहे. अकोट (Akot) तालुक्यातल्या बल्लारखेड इथे सनम्स देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव वनविभागाचे पथक दाखल झालं होतं. याच वेळी काहींनी वन विभागाच्या पथकावर हल्ला चढवत दगडफेक (Crime News) केलीये. यात वनविभागाच्या वाहनाच काही प्रमाणात नुकसान झालंय.
वनविभागाच्या पथकावर दगडफेक, ग्रामस्थांचे गंभीर आरोप
पुढे आलेल्या माहितीनुसार, वाघाच्या शिकार प्रकरणाच्या तपासात वन विभागाचे पथक बल्लारखेड इथे आलं होतं. काही दिवसांपूर्वी वाघाची शिकार करून अवयव काढणारे काहींच्या मुसक्या वनविभागाने आवळल्या होत्या. याच प्रकरणात काही संशयीतांना आज बल्लारखेड येथे समन्स देण्याकरीता अंजनगावच वनविभागाच पथक गेले होते. याचवेळी पथकावर आणि वाहनावर देखील दगडफेक झाल्याचे समजते आहे. घटनास्थळी अकोल्यातल्या अकोट ग्रामीण पोलीसांचा मोठा बंदोबस्त दाखल आहे. दरम्यान, आदिवासी लोकांनी वन विभागाच्या कारवाईवर आपेक्ष घेतलाय. वनविभाग दडपशाही करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.
जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध दाम्पत्यास मारहाण
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चिरेखनी येथे जादूटोणाच्या संशयावरून एका वृद्ध दांपत्यास मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. नामदेव पारधी (65) हे पत्नी सुभद्रा व कारणबाई या दोन पत्नींसोबत राहतात. आरोपी मुन्ना उर्फ संतोष रहांगडाले (45) व सुन्ना उर्फ प्रमोद रहांगडाले (42, रा. चिरेखनी) हे नामदेव पारधी यांच्या घरासमोर आले व तुझ्यामुळे माझा मुलगा मरण पावला, असे बोलू लागले. यावर नामदेव पारधी यांनी, मी तुमच्या मुलाला काय केले? तुमचा मुलगा माझ्यामुळे कसा मरण पावला, अशी विचारणा केली. यावर मुन्ना रहांगडाले व सुन्ना रहांगडाले या दोघांनी माझ्या मुलावर जादू केली व जादूने मारले, असे म्हणत नामदेव पारधी यांना शिवीगाळ करून काठीने पाठीवर व डोक्यावर मारहाण केली. तर पिंटू उर्फ सतीश गुलाब रहांगडाले याने थापड बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी बीएनएस ११८ (१), ११५ (२), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- Maharashtra Election 2024 : अकोला जिल्ह्यातील दोन गावांत बॅलेटवर मॉक पोलची घोषणा; गावकरी अनभिज्ञ, प्रसिद्धी स्टंटची चर्चा
-
खळबळजनक! नागपूरच्या द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; बीडीडीएस पथकाकडून पाहणी