श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा.पैशांसाठी अपहरण आणि हत्या केल्याचा पोलिसांचा दावा.
![श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात Ahmednagar cops nab 5 in Gautam Hiran kidnapping and murder case श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/10/ff074186d7f866a1b6020c46b9145922_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : अहमदनगर पोलिसांनी आज मोठं यश संपादन केलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ बोठे यांच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा उलगडा केल्याचा दावा केलाय. हिरण यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एकुण 7 आरोपींना जेरबंद केलं आहे.
बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचं 1 मार्च रोजी नाट्यमयरित्या अपहरण झाल होतं. त्यानंतर 7 मार्चला श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात निर्जनस्थळी कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळुन आला होता. मृत गौतम हिरण यांच्या हत्येच्या तपासाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच श्रीरामपूरचे स्थानिक आमदार लहू कानडे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर अहमदनगर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती.
एकूण पाच आरोपींना अटक
आज एकूण पाच आरोपी संदिप हांडे, जुनेद शेख, अजय चव्हाण आणि नवनाथ निकम यांना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून तर एकाला नगर मधुन अटक केली. आत्तापर्यंत एकुण 7 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी आणि हिरण यांच्याकडे असलेल्या 1 लाख 65 हजार रुपयांच्या रकमेसाठी आरोपींनी अपहरण आणि खून केल्याचा उलगडा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी केलाय.
कॉम्प्युटर सॉप्टवेअरचं शिक्षण घेतलेले गौतम हिरण हे बडे व्यापारी होते. हिंदुस्तान लिवरची एजन्सी असल्याने दररोज लाखोंची उलाढाल यावर पाळत ठेवून त्यांची खंडणीसाठी अपहरण आणि हत्या झाल्याचं पोलिस तपासात समोर आलंय. या घटनेमुळे व्यापारी वर्गात मात्र भितीचं वातावरण पसरलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)