Bal Bothe Arrested | बाळ बोठे राहत असलेल्या हॉटेलच्या रुमला बाहेरून कुलूप लावलं होतं, पोलिसांची माहिती
रेखा जरे आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करतील या कारणातून हत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र हत्ये मागचं नेमकं कारण काय आहे? याचा तपास आता पोलिस करत आहे.
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडचे अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडमधील प्रमुख सूत्रधार असलेला आरोपी बाळ बोठे याला अहमदनगरच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. बाळ बोठेला हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. बाळे बोठे ज्या रूममध्ये थांबला होता त्या रुमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते, अशी माहिती अहमदनगरचे पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. हत्या झाल्यानंतर सुपा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत मारेकऱ्यासह पाच आरोपींना अटक केली. या आरोपींकडे चौकशी केल्यानंतर मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे याने सुपारी देऊन ही हत्या केल्याची माहिती पुढे आली. बाळ बोठेला अटक करण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तैनात करू विविध जिल्ह्यांमध्ये छापे देखील टाकले. मात्र बाळ बोठेला अटक करण्यात पोलिसांना अपयश आले.
अखेर हैदराबाद येथे बाळ बोठे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी बाळ बोठेला हैदराबाद येथील एका हॉटेलमधून अटक केली. इतकेच नाही तर बाळ बोठेला मदत करणाऱ्या इतर पाच जणांना देखील पोलिसांनी जेरबंद केले. विशेष म्हणजे ज्या रूम मध्ये बाळ बोठे होता त्या रुमाल बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. मात्र तरी देखील पोलिसांनी बाळ बोठेला जेरबंद केलं आहे. या अटकेसाठी पोलिसांनी 5 दिवस विशेष ऑपरेशन केले. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. तब्बल 102 दिवसानंतर पोलिसांनी बाळ बोठेला अटक केलीय.
Rekha Jare Murder Case | रेखा जरे हत्या प्रकरणातील फरार बाळ बोठेंना तीन महिन्यांनंतर अटक
रेखा जरे आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करतील या कारणातून हत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र हत्ये मागचं नेमकं कारण काय आहे? याचा तपास आता पोलिस करत आहे.
पत्रकार बाळासाहेब बोठेंचं पुस्तक हद्दपार, बाळासाहेब बोठे रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी
रेखा जरे हत्याकांड घटनाक्रम
- 30 नोव्हेंबर रोजी अहमदनगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाटाजवळ रेखा जरे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
- अवघ्या 18 तासात फिरोज शेख, ज्ञानेश्वर शिंदे आणि आदित्य चोळके यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर 24 तासात सर्व 5 आरोपींना अटक केले.
- बाळ बोठेला सुपारी दिल्याची कबुली आरोपींनी पोलिसांसमोर दिली.
- बाळ बोठेला अटक करण्यासाठी 5 पोलिसांची पथके तैनात करण्यात आली.
- नाशिक, पुणे, सोलापूर अशा विविध जिल्ह्यात पोलीसांनी छापे टाकले. मात्र बाळ बोठेला पकडण्यात अपयश आलं.
- 8 डिसेंबर रोजी बाळ बोठेच्या जामिनासाठी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल.
- 16 डिसेंबर रोजी बाळ बोठेचा अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात जमीन अर्ज फेटाळला.
- त्यांनतर औरंगाबाद उच्च न्यायालयाने देखील जमीन अर्ज फेटाळला.
- 26 फेब्रुवारी रोजी 5 आरोपींविरोधात दोषारोपपत्र पारनेर न्यायालयात दाखल करण्यात आले.
- 5 मार्च रोजी रेखा जरे याच्या मुलाचे पोलिस अधीक्षक कार्यासमोर 1 दिवसीय उपोषण केलं.
- अखेर 102 दिवसांनंतर बाळ बोठे याला एका हॉटेलमधून घेतले ताब्यात. त्यासोबत त्याला मदत करणाऱ्या 5 जणांना देखील अटक झाली.
- रेखा जरे हत्याकांड प्रकरणात मुख्य सूत्रधार बाळ बोठे यांच्यासह 11 आरोपी अटकेत आहेत.