प्रियकरासोबत राहण्यासाठी नकार दिल्याने प्रियकराने केली प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या
नियाज आणि हत्या झालेल्या तरुणीचे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेम संबंध होते. मात्र तरुणी आता नियाजबरोबर राहण्यास देखील तयार नव्हती याच विषयावरून रियाज आणि त्या तरुणीचे भांडण झाले.

मुंबई : मुंबईच्या अंधेरी येथील अंधेरी मेट्रो स्टेशन खालील सिद्धेश्वर महिला संघ संचलित सार्वजनिक शौचालयात एका महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 27 मे ला रात्री साधारण आठ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान एक मुलगा आणि एक मुलगी शौचालयात आले होते. त्यानंतर काही काळाने मुलगा शौचालयतून निघून गेला मात्र मुलगी शौचालयत असल्याने तिथल्या लोकांना संशय आला. जेव्हा ती महिला बराच वेळ का बाहेर येत नाही हे पाहण्यासाठी गेले असता रक्ताच्या थारोळ्यात त्या महिलेचा मृतदेह पडलेला होता.
नियाज आणि हत्या झालेल्या तरुणीचे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेम संबंध होते. मात्र तरुणी आता नियाजबरोबर राहण्यास देखील तयार नव्हती याच विषयावरून रियाज आणि त्या तरुणीचे भांडण झाले. त्यानंतर प्रेयसीला घेऊन नियाज अंधेरी येथे घेऊन गेला. त्यानंतर ते सिद्धेश्वर महिला संघ संचलित शौचालयात गेले. तेथे गेल्यानंतर रियाजने तरुणीवर हल्ला करायला सुरुवात केली आणि दगडाने ठेचून शौचालयात हत्या केली. हत्येनंतर जवळच असलेल्या अंधेरी रेल्वे स्थानकावर पळत गेला आणि तेथे विरार च्या दिशेने जाणारी लोकल पकडून तो फरार झाला.
सायंकाळची वेळ असल्याने रेल्वेला गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेऊन नियाज फरार होण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी संपूर्ण तपास सुरू केल्यानंतर रियाज हा मीरा रोड येथील कनाकिया चौकी नयानगर येथील राहणार असून त्याचा भंगाराचा व्यवसाय आहे. ही माहिती पोलिसांनी शोधून काढली आणि सापळा रचून नियाजला अटक केली. त्या तरूणीची दगडाने ठेचून आपणच हत्या केल्याचे नियाजने कबूल केले.























