एक्स्प्लोर

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घरी मोठं घबाड; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश; अधिकीरीही चक्रावले

सन 2005 मध्ये वनविभागाने ताब्यात घेतलेल्या तक्रारदाराच्या 7 गुंठे जमिनीचा ताबा परत मिळवून देण्यासाठी परिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे यांनी 20 लाखांची लाच मागितली होती.

पालघर : लाचलुचपत विभागाने (ACB) मंगळवारी एका वनपरीक्षेत्र अधिकाऱ्याला 20 लाख रुपयांच्या लाचप्रकरणी रंगेहात पकडल्यानंतर आता त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे. वसई तालुक्यातील ससूनवघर गावातील सात गुंठे जमिनीच्या प्रकरणात २० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे आणि अन्य दोघांविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. रात्री वनपरिक्षेञ अधिकारी संदीप चौरे याच्या घराची झडती घेतली असता, लाचलुचपत विभागाला चौरे यांच्या घरी 57 तोळे सोने (Gold) आणि तब्बल 1 कोटी 31 लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे. 

सन 2005 मध्ये वनविभागाने ताब्यात घेतलेल्या तक्रारदाराच्या सात गुंठे जमिनीचा ताबा परत मिळवून देण्यासाठी आणि वरिष्ठ कार्यालयात अनुकूल अहवाल देण्यासाठी परिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे यांनी 20 लाखांची लाच मागितली होती. याप्रकरणी चौकशीदरम्यान, चौरे यांनी आरोपी चंद्रकांत पाटील आणि अन्य एका व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगितल्याचे उघड झाले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी चंद्रकांत पाटील याला, मंगळवारी दहा लाखांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले होते. यावेळी चौकशीदरम्यान चौरे यांचा मुख्य सहभाग समोर आला होता. त्यामुळे चौरे, पाटील आणि एका अनोळखी इसमाविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधीत कायदा सन 2018 चे कलम 7 आणि 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यात लाचलुचपत विभागाने अद्याप एकालाही अटक केली नाही. 

57 तोळं सोनं, 1.31 कोटींची रोकड

दरम्यान, लाचलुचपत विभागाने संदीप चौरे यांच्या निवासस्थानी झडती घेतली असता, 57 तोळे सोने आणि तब्बल 1 कोटी 31 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या जप्तीमुळे चौरे यांच्या मालमत्तेचा तपशील अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पालघर लाचलुचपत विभाग या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, चौरे आणि अन्य आरोपींच्या मालमत्तेची पडताळणी केली जात आहे. वनविभागातील अधिकाऱ्यांचा या प्रकरणातील सहभाग लक्षात घेता, वसई विरार मधील अधीकतर वन क्षेञ हे चाळ माफियांच्या घशात कशा प्रकारे गेले असतील हे समोर आलं आहे. चार वर्षापूर्वी ही  वसईच्या रेंज ऑफीस कार्यालयात अधिकारी दिलीप तोंडे यांना ही 10 लाखाची लाच प्रकरणी लाचलुचपत विभागाने अटक केली होती.

हेही वाचा

Kazakhstan Plane Crash : कझाकिस्तानमध्ये 100 हून अधिक प्रवासी असलेलं विमान कोसळलं, भीषण अपघातात फ्लाईट चक्काचूर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas PC Beed | मी कुणाच्या बापाला भीत नाही, सुरेश धसांची आक्रमक पत्रकार परिषदABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 10 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सUday Samant PC : उद्योगमंत्री उदय सामंत नाराज? तातडीची पत्रकार परिषद घेत म्हणाले, तो माझा अधिकार!Devendra Fadnavis : अश्लीलतेचे पण काही नियम असतात... समय रैना-अल्लाहबादियावर फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
Raigad Crime News : चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
Embed widget