Zomato IPO Day 1 Subscription : झोमॅटोचे आयपीओ खुले; पहिल्याच दिवशी रिटेल पोर्शन 1.38 पटींनी सबस्क्राईब
Zomato IPO : फूड डिलिव्हरी कंपनी असलेल्या झोमॅटोचे आयपीओ आजपासून खुले झाले आहेत. त्याला गुंतवणूकदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई : फूड डिलिव्हरी कंपनी असलेल्या झोमॅटोचे आयपीओ आजपासून खुले झाले आहेत. त्याला गुंतवणूकदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येत आहे. 9,375 कोटी रुपयांपासून या आयपीओला सुरुवात झाली असून 12 वाजेपर्यंत रिटेल पोर्शनचे 1.38 टक्क्यांनी सबस्क्रिप्शन झालं आहे. झोमॅटोने रिटेल गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के हिस्सा हा रिझर्व्ह ठेवला होता. झोमॅटोचा हा आयपीओ 16 जुलै रोजी बंद होणार आहे.
झोमॅटो ही आयपीओ सुरु करणारी पहिलीच फूड डिलिव्हरी कंपनी आहे. सध्या या कंपनीचे व्हॅल्यूएशन जास्त असल्याने याच्या आयपीओत गुंतवणूक करण्याचा सल्ला अर्थतज्ज्ञांकडून दिला जात आहे. सध्या झोमॅटोच्या आयपीओची प्राईस बँड ही 72 ते 76 रुपये इतकी आहे. त्यामध्ये 195 शेअरर्सचा एक लॉट उपलब्ध असेल. कंपनीच्या नियमानुसार, गुंतंवणूकदार हे कमाल 13 लॉट घेऊ शकतात. तसेच कंपनीच्या नियमानुसार एक गुंतवणूकदार हा दोन लाख रुपयांहून जास्त गुंतवणूक करु शकत नाही.
आयपीओच्या आधारे किंमत काढली तर झोमॅटोचे बाजारातील मूल्यांकन हे 64,365 कोटी रुपये इतकं आहे. झोमॅटो एक रेस्टॉरंट अॅग्रिगेटर आहे. या कंपनीकडून ग्राहकांना रेस्टॉरंटमधून फूड डिलिव्हर केलं जातं. तसेच या हॉटेल आणि रेस्टॉरंटचे रिव्ह्यूदेखील दिले जातात, त्यांचं मार्केटिंग केलं जातं. या कंपनीचा कोणताही प्रमोटर नाही. या कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये इन्फो एज, अॅन्ट फायनान्शियल आणि उबेरचा समावेश आहे.
गेल्या वर्षी झोमॅटोच्या महसूलात 96 टक्क्यांची वृद्धी झाली होती. सन 2019 साली झोमॅटोचा महसूल हा 1398 कोटी रुपये इतका होता. गेल्या वर्षी म्हणजे 2020 साली त्यामध्ये वाढ होऊन तो 2743 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी झोमॅटोला 403 मिलियन ऑनलाईन ऑर्डर्स मिळाल्या होत्या. त्याचा आकडेवारीत हिशोब केला तर तो 11,221 कोटी रुपये इतका आहे. गेल्या वर्षी झोमॅटोने दोन लाख डिलिव्हरी पार्टनर्सच्या माध्यमातून भारतभरात जवळपास 500 शहरांत फूड डिलिव्हरी केली होती.
महत्वाच्या बातम्या :