योगामुळं सुधारलं अर्थव्यवस्थेचंही आरोग्य, महिलांना मिळाल्या रोजगाराच्या संधी, व्यवसायातही मोठी वाढ
योगामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेचंही आरोग्य सुधारलं (improving health of Economy business) आहे. मोठ्या प्रमाणात योगाच्या माध्यमातून व्यवसाय विस्तारला आहे. त्यामुळं अर्थव्यवस्थेतही वाढ होत आहे.
Economy Growth By Yoga: आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस (International Yoga Day) आहे. जगभरात मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातोय. दरम्यान, योगामुळं आपलं आरोग्य सुधारते. त्याचबरोबर योगामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेचंही आरोग्य सुधारलं (improving health of Economy business) आहे. मोठ्या प्रमाणात योगाच्या माध्यमातून व्यवसाय विस्तारला आहे. त्यामुळं अर्थव्यवस्थेतही वाढ होत आहे.
21 जून हा दिवस जगभरात 'योग दिन' म्हणून साजरा केला जातो. 'आंतरराष्ट्रीय योग दिना'ने शरीर आणि मन निरोगी ठेवण्याचे सूत्र जगाला दिले आहे. तेव्हापासून या योगाशी संबंधित व्यवसायही वाढत आहेत. यामध्ये पोशाख, उपकरणे, चटई, क्लब आणि योग केंद्र यामध्ये योगाचा विस्तार झाला आहे. यामाध्यमातून व्यवसाय विस्तारला आहे. या खास दिवसामुळं जगभरात भारताची प्रतिमा खूप सुधारली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचीही प्रगती झालीय.
2032 पर्यंत योग व्यवसाय 250.70 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा
योगाच्या व्यवसायातील वाढीबाबत EMR चा अहवाल आला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की 2024 ते 2032 दरम्यान योगाशी संबंधित जागतिक बाजारपेठ वार्षिक 9 टक्के दराने वाढू शकते. 2023 मध्ये योगाच्या जागतिक बाजारपेठेचा आकार सुमारे 115.43 अब्ज डॉलर होता. जो 2032 पर्यंत 250.70 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. योग व्यवसायातील एक गोष्ट म्हणजे ते अर्थव्यवस्थेला चालना देत आहे. कारण योगासाठी वापरल्या जाणाऱ्या मॅट्स, कुशन, ब्लॉक्स, कपडे आणि इतर वस्तूंची मागणी बाजारात वाढली आहे.
योग व्यावसायिकांमध्ये 72 टक्के महिला
योगामुळं महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. आकडेवारीनुसार, जगभरात काम करणाऱ्या योग व्यावसायिकांपैकी 72 टक्के महिला आहेत. भारतातच, योग वर्ग उद्योगाचा महसूल आकार सुमारे 2.6 अब्ज डॉलर्स आहे. तर योग उद्योगाचा आकार 80 अब्ज डॉलर्स इतका आहे. कोविड-19 नंतर, 154 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली आहे. महिलांसह योगाशी संबंधित सर्व व्यावसायिकांसाठी हा एक चांगला करिअर पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे. योगाच्या माध्यमातून केवळ ऑफलाइन मार्केटच नाही तर ऑनलाइन मार्केटमध्येही मोठा फायदा होत आहे. लोक योगा स्टुडिओ, योग क्लब आणि जिममध्ये योगाशी संबंधित अभ्यासक्रम देखील घेत आहेत. योगामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेचंही आरोग्य सुधारलं आहे. मोठ्या प्रमाणात उलाढाल वाढली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
International Yoga Day at UN: जिथं मोदी तिथं विक्रम...योग दिनाच्या कार्यक्रमाने संयुक्त राष्ट्र मुख्यालय गिनिज बुकात; वाचा नेमकं काय झालं?