(Source: Poll of Polls)
International Yoga Day at UN: जिथं मोदी तिथं विक्रम...योग दिनाच्या कार्यक्रमाने संयुक्त राष्ट्र मुख्यालय गिनिज बुकात; वाचा नेमकं काय झालं?
International Yoga Day 2023: संयुक्त राष्ट्र मुख्यालयाची गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.
Guinness World Record: संयुक्त राष्ट्र मुख्यालयाची (UN) गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. योग दिनानिमित्ताने (Yoga Day) आयोजित करण्यात आलेल्या योग सत्रात सर्वाधिक देशांच्या नागरिकांनी हजेरी लावली. यासाठी या विक्रमाची नोंद करण्यात आली.
#WATCH | Guinness world record for most nationalities in a Yoga session created at the Yoga Day event led by PM Narendra Modi, at the UN headquarters in New York. #InternationalDayofYoga2023 pic.twitter.com/1uClPB1led
— ANI (@ANI) June 21, 2023
#WATCH | A large numbers of participants take part in the Yoga Day event at the United Nations Headquarters in New York. The event is being led by Prime Minister Narendra Modi.#9thInternationalYogaDay pic.twitter.com/s8pAe7zhnk
— ANI (@ANI) June 21, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात योगासने प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जगभरातील विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. योग दिनाच्या कार्यक्रमात विविध देशांचे नागरिकत्व असलेली लोक पहिल्यांदाच इतक्या प्रमाणात सहभागी झाले होते. हादेखील एक विक्रम आहे. त्याची दखल गिनिज बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली.
पंतप्रधान मोदी यांनी काय म्हटले?
योग दिनाचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी छोटेखानी भाषण केले. त्यांनी म्हटले , 9 वर्षांपूर्वी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव सादर करण्याची संधी मिळाली होती. योग हा भारतातून आलाय, पण कॉपीराइट आणि पेटंट, रॉयल्टी मुक्त असल्याचे त्यांनी म्हटले.
योग ही जीवन जगण्याची पद्धत आहे. विचार आणि कृतींमध्ये सजग राहण्याचा हा एक मार्ग आहे. स्वतःशी, इतरांशी आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याचा हा एक मार्ग आहे. निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी योगाच्या शक्तीचा उपयोग करूया असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. योगासने तुम्ही सामुदायिकरीत्या अथवा एकटेपणाने देखील करू शकता. योगासने हे सर्व धर्म आणि संस्कृतीसाठी असल्याचेही त्यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदींचे 21 जूनचे ठरलेले कार्यक्रम
- अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये पंतप्रधान मोदी पोहोचतील.
- नॅशनल सायन्स फाऊंडेशनमध्ये 'स्किलिंग फॉर फ्युचर इव्हेंट'मध्ये मोदी उपस्थित राहणार आहेत.
- अमेरिकेच्या फर्स्ट लेडी - जिल बिडेन यांची मोदी भेट घेतील आणि 'नॅशनल सायन्स फाऊंडेशन'ला देखील ते भेट देणार आहेत.
- पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनमधील एका बिझनेस मीटिंगला उपस्थित राहणार आहेत.
- यूएस फर्स्ट लेडी - जिल बिडेन यांच्यासह स्टेट डिनरसाठी मोदी जातील.
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन हे पंतप्रधान मोदींचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत करतील.
- व्हाईट हाऊसमध्ये मोदींच्या खासगी भेटी होतील.
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल या मोदींना व्हाईट हाऊसमध्ये डिनरसाठी होस्ट करतील.