विप्रो कंपनी मसालेही विकणार, मोठ्या कराराने पॅकेज्ड फूड आणि स्पाईस सेगमेंटमध्ये प्रवेश जाहीर
Wipro: देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांमध्ये विप्रोची ओळख आहे. हीच प्रसिद्ध फर्म आता तुमच्या जेवणाची चवही वाढवणार आहे.
wipro acquires packaged food and spices: देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांमध्ये विप्रोची ओळख आहे. हीच प्रसिद्ध फर्म आता तुमच्या जेवणाची चवही वाढवणार आहे. कारण विप्रो कंझ्युमर केअरने केरळमधील सर्वात जास्त विकल्या जाणार्या पारंपारिक खाद्यपदार्थांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या निरापाराला ताब्यात घेऊन पॅकेज्ड फूड आणि मसाल्यांच्या विभागात प्रवेश करण्याची घोषणा केली. मात्र, कंपनीने करारासंबंधीचे तपशील जाहीर केलेला नाही. विप्रो समूहाच्या युनिटने या संदर्भात निरापारासोबत ठोस करार केल्याचं मात्र कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. यासह विप्रो कंझ्युमर केअरने मसाल्यांच्या बाजारातही प्रवेश केला आहे. या क्षेत्रातील इतर कंपन्यांमध्ये डाबर, इमामी, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि आयटीसी यांचा समावेश आहे.
विप्रो कंझ्युमर केअर अँड लाइटनिंगचे 13वे अधिग्रहण
विप्रो कंझ्युमर केअर अँड लाइटनिंग आणि विप्रो एंटरप्रायझेस, विप्रो एंटरप्रायझेसचे कार्यकारी संचालक विनीत अग्रवाल यांनी याबाबत प्रतिपादन करताना, निरापारा हे आमचे 13 वे अधिग्रहण आहे, मसाले तयार श्रेणीत आमचे स्थान मजबूत करेल आणि सर्वात वेगाने वाढणाऱ्या ग्राहकांपैकी विप्रो या व्यवसायात टिकेल असा विश्वास व्यक्त केला
सध्या निरापाराचा 63 टक्के व्यवसाय केरळमधून येतो, उर्वरित 8 टक्के भारतातून आणि उर्वरित 29 टक्के आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधून येतो, ज्यात गल्फ कोऑपरेशन कौन्सिल देशांचा समावेश आहे. अस्सल, शुद्ध आणि विश्वासार्ह मसाल्यांचे मिश्रण देऊन ग्राहकांना असंघटित बाजारातून संघटित बाजारपेठेकडे वळवण्याची या क्षेत्रात मोठी संधी आहे असल्याचं विप्रो कंझ्युमर केअर आणि लाइटिंग आणि विप्रो एंटरप्रायझेसचे कार्यकारी संचालक अनिल चुघ यांनी म्हटलं.
विप्रो कंपनीची माहिती
विप्रो ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जी माहिती तंत्रज्ञान (IT), सल्ला आणि व्यवसाय प्रक्रिया सेवांमध्ये व्यवहार करते. याचे मुख्यालय बंगलोर, कर्नाटक येथे आहे. याची स्थापना 1945 मध्ये मोहम्मद प्रेमजी यांनी केली होती. अझीम प्रेमजी, भारतातील एक महान उद्योजक आणि परोपकारी, आज कंपनीचे मालक आहेत. कंपनी IT सल्ला, कस्टम अॅप्लिकेशन डिझाइन, डेव्हलपमेंट, री-इंजिनियरिंग, BPO सेवा, क्लाउड, मोबिलिटी, अॅनालिटिक्स सेवा, संशोधन आणि विकास आणि हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर डिझाइन प्रदान करते..
ही बातमी वाचयला विसरु नका:
Lionel Messi offered a bisht : कतारच्या राजेंनी मेस्सीला अर्पण केला तो बिष्ट आहे तरी काय? मेस्सीने वर्ल्डकप स्वीकारताना तो का परिधान केला होता??