What Is Jio AirFiber : जिओ एअरफायबर म्हणजे आहे तरी काय? किती असणार शुल्क? जाणून घ्या फीचर्स आणि इतर माहिती...
What Is Jio AirFiber : रिलायन्सच्या एजीएममध्ये आज जिओ एअरफायबर सेवेची घोषणा करण्यात आली. पण, ही एअरफायबर सेवा आहे तरी काय?
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजची आज वार्षिक सर्वसाधारण बैठक (Reliance AGM) पार पडली. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आजच्या एजीएममध्ये जिओ एअरफायबर सेवा सुरू करण्याची घोषणा केली. मागील वर्षाच्या एजीएममध्ये जिओ एअरफायबर सेवेची घोषणा करण्यात आली होती. आजच्या बैठकीत ही सेवा 19 सप्टेंबरपासून सुरू करण्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली.
JioAirFiber ही सेवा JioFiber सारख्या फायबर-ऑप्टिक कनेक्शन प्रमाणेच हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी ऑफर करते. मात्र, AirFiber सेवेत वायरिंगची आवश्यकता न ठेवता वैयक्तिक वाय-फाय नेटवर्कसाठी ट्रू 5G (Truth 5G) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. युजर्ससाठी अनुकूल सेटअपमध्ये साधी प्लग-अँड-प्ले फंक्शनचा वापर करता येतो. त्यामुळे युजर्सना त्यांचे वाय-फाय हॉटस्पॉट सहजपणे तयार करता येतात.
जिओ एअरफायबर वेगळं कसं? ( How is Jio AirFiber different from JioFiber? )
JioFiber हे फायबर ऑप्टिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. युजर्सला फायबर ऑप्टिक वायर थेट त्याच्या घरी मिळणे आवश्यक आहे. जिथे ते एकतर राउटरशी किंवा थेट इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता असलेल्या डिव्हाइसशी जोडले जाते.
JioFiber हे अधिक स्थिर हाय-स्पीड देते. परंतु कनेक्टिव्हिटी देण्यासाठी अधिक पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. दुसरीकडे, Jio AirFiber हे फक्त एक डिव्हाइस आहे. युजर्सने फक्त खरेदी करणे आणि ते चालू करणे आवश्यक आहे. हे वायफाय हॉटस्पॉट सारखे कार्य करते, पण इंटरनेटचा वेग हायस्पीडने असतो.
हाय-स्पीड कनेक्टिव्हिटीचा विस्तार होणार?
एअरफायबर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दररोज 1,50,000 कनेक्शन्स जोडण्याची क्षमता आहे. त्यामुळे कंपनीच्या नेटवर्कचा विस्तार करणे आणि संभाव्यतः 200 दशलक्ष व्यक्तींपेक्षा जास्त युजर्सपर्यंत पोहोचण्याची महत्त्वाकांक्षा दर्शवते. जिओ फायबरचे 10 दशलक्षाहून अधिक ग्राहक आहेत. कंपनीचे ऑप्टिकल फायबर नेटवर्क 1.5 दशलक्ष किलोमीटरपेक्षा जास्त पसरलेले आहे.
जिओची एअरटेलला टक्कर?
जिओ एअरफायबरची स्पर्धा ही एअरटेल एक्सस्ट्रीम एअरफायबर (Airtel Xstream AirFiber) सोबत असणार आहे. एअरटेलने याच महिन्यात एअरफायबर ही सेवा लाँच केली. Airtel Xstream AirFiber हे सहा महिन्यांच्या प्लानसाठी 4,435 रुपये आकारत आहे. त्यामुळे आता जिओ एअरफायबरचे शुल्क हे एअरटेलच्या तुलनेत कमी असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
डिसेंबरपर्यंत देशभरात 5G रोलआऊट होणार
Jio 5G ऑक्टोबरच्या अखेरीस रोलआऊट सुरू होईल आणि डिसेंबर 2023 पर्यंत ते देशभरात आणलं जाईल. जिओची देशात 85 टक्के 5G सेवा असणार आहे.