एक्स्प्लोर

इमर्जन्सी फंड उभा करायचाय, पण कसा करू समजत नाहीये? सोप्या भाषेत समजून घ्या 67:33 सूत्राची जादू!

खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांची नोकरी कधी जाईल, हे सांगता येत नाही. कोणत्याही वेळी बिकट परिस्थिती येऊ शकते. त्यामुळे अशा वेळेला इमर्जन्सी फंडची मदत होते.

Emergency Fund for Salaried : एकदा सरकारी नोकरी मिळाली आर्थिक विवंचना दूर होतात. पण प्रत्येकालाच सरकारी नोकरी मिळते असे नाही. आपल्या देशात लाखो लोक हे खासगी क्षेत्रात वेगवेगळ्या नोकऱ्या करतात. खासगी क्षेत्रात नोकरी कधी जाईल हे सांगता येत नाही. तुम्ही काम करत असलेली कंपनी तुम्हाला कधीही काढून टाकू शकते. अचानकपणे नोकरी गेल्यानंतर मोठे आर्थिक संकट उभे राहू शकते. त्यामुळेच अशा स्थितीत आर्थिक विवंचना उभी राहू नये यासाठी आपत्कालीनी बचत (इमर्जन्सी फंड) असणे फार गरजेचे आहे. आपत्कालीन बचत करायची असेल तर तुम्ही एक खास सूत्र वापरू शकता. 

नोकरी गेल्यावर येऊ शकते अडचण

नोकरी गेल्यानंतर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नसेल तर तुमच्यासमोर एकाच क्षणात मोठ्या अडचणी उभ्या राहू शकतात. घरात तुम्ही एकटेच कमवणारे असाल तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. त्यामुळे अशा स्थितीत इमर्जन्सी फंड कामी येतो. इमर्जन्सी फंड उभा करण्यासाठी एक सूत्र फार कामी पडू शकते हा फॉर्म्यूला 67:33 असा आहे.

नेमका फॉर्म्यूला काय? 

आर्थिक सल्लागारांच्या मते इमर्जन्सी फंड उभारण्यासाठी 67:33 हे सूत्र फार मदतीला येऊ शकते. या सूत्राअंतर्गत तुमच्या पगाराचे तुम्ही दोन भाग करायला हवेत. यातील दुसरा भाग म्हणजेच तुमच्या पगारातील 33 टक्के रक्कम ही तुम्ही इमर्जन्सी पंडसाठी ठेवायला हवी. तर उर्वरीत रक्कम म्हणजेच 67 टक्के रक्कम तुम्ही तुमच्या इतर खर्चासाठी वापरायला हवी. उदाहरणासह समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 50,000 रुपये पगार मिळतो, असे गृहित धरुया. 67:33 या सूत्राप्रमाणे तुमच्या पगाराचे 33,500 रुपये आणि 16,500 रुपये असे दोन भाग पडतील. यातील 16500 रुपये तुम्ही इमर्जन्सी फंड म्हणून काढून ठेवू शकता. 

इमर्जन्सी फंड किती असावा? 

आर्थिक सल्लागारांच्या मते नोकरी गेल्यानंतर सहा महिने आर्थिक चणचण भासणार नाही, एवढा इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असायला हवा. काही तज्ज्ञांच्या मते हा इमर्जन्सी फंड एका वर्षाचा खर्च निघेल एवढा असायला हवा. इमर्जन्सी फंड तयार करा म्हणणे फार सोपे आहे, पण तो प्रत्यक्ष उभा करणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे हा एमर्जन्सी फंड उभा करताना काही ट्रिक वापरता येऊ शकतात. उदाहरणार्थ तुम्हाला कंपनीकडून काही बोनस मिळत असेल, काही इन्सेटिव्ह्स मिळत असतील तर ही रक्कम तुम्ही एमर्जन्सी फंडात टाकू शकता. इमर्जन्सी फंडासाठी तुम्ही जमा करत असलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवून त्या पैशांपासून आणखी पैसे कमवू शकता. 

हेही वाचा :

बम्पर रिटर्न्स देणारे स्टॉक्स हवे आहेत? ही घ्या यादी; मिळवा बक्कळ पैसे!

सोमवारी होणार पैशांची बरसात? 'हे' चार पेनी स्टॉक देऊ शकतात दमदार रिटर्न्स!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
Supriya Sule on Dhananjay Mahadik : हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकलेABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 11 November 2024PM Modi Speech Mumbai  : पंतप्रधान मोदी 14 नोव्हेंबरला मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानात होणार सभाAjit Pawar Baramati : साहेब नसतील तर तालुका कोण बघणार?अजितदादांचा बारामतीकरांना सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
Supriya Sule on Dhananjay Mahadik : हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
Ajit Pawar : मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
Yugendra Pawar in Baramati: आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
Maharashtra Assembly Elections 2024 : माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा
Embed widget