एक्स्प्लोर

Vedanta Political Donation : वेदांता समूह राजकीय पक्षांना देणार 200 कोटींची देणगी; कोणत्या पक्षाला किती निधी मिळणार?

Vedanta Political Donation : वेदांताच्या संचालक मंडळाने मंजूर केलेल्या ठरावानुसार 200 कोटी आणि 57 कोटी रुपयांच्या राजकीय देणग्या देण्याची मान्यता मार्च 2025 पर्यंत वैध आहे.

Vedanta Political Donation Update :  एकीकडे, वेदांत लिमिटेड स्वतः थकीत कर्ज फेडण्यासाठी रोख रक्कम जमा करण्याकडे भर देत आहे. तर, दुसरीकडे वेदांता कंपनीच्या संचालक मंडळाने मोठा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे.राजकीय पक्षांना देणगी देण्यात कंपनी मागे नसल्याचे समोर आले आहे. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी वेदांत लिमिटेडच्या संचालक मंडळाने ठराव मंजूर करून राजकीय पक्षांना 200 कोटी रुपयांची देणगी देण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय, मंडळाने 57 कोटी रुपये देण्यासही मान्यता दिली आहे जी गेल्या वर्षी जून 2022 मध्ये राजकीय पक्षांना देण्यास मान्यता देण्यात आली होती, परंतु ही रक्कम जारी होऊ शकली नाही.

'इकॉनॉमिक टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, वेदांताच्या संचालक मंडळाने 5 नोव्हेंबर 2023 रोजी राजकीय पक्षांना देणग्या देण्यास मान्यता देणारा ठराव मंजूर केला होता. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे इलेक्टोरल बाँड जारी करण्याच्या 29 व्या टप्प्याच्या दोन दिवस आधी हा निर्णय घेण्यात आला. वेदांताच्या संचालक मंडळाने मंजूर केलेल्या ठरावानुसार 200 कोटी आणि 57 कोटी रुपयांच्या राजकीय देणग्या देण्याची मान्यता मार्च 2025 पर्यंत वैध आहे. ही देणगी थेट किंवा इलेक्टोरल ट्रस्ट आणि इलेक्टोरल बाँड्सच्या सबस्क्रिप्शनच्या स्वरूपात दिली जाऊ शकते.

कोणत्या पक्षांना किती देणगी मिळणार?

कंपनीच्या मंडळाने ठराव मंजूर करून राजकीय पक्षाला किती देणगी द्यायची हे ठरवण्यासाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना अधिकार दिले आहेत. सध्या कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल तर उपाध्यक्षपद नवीन अग्रवाल यांच्याकडे आहे. वृत्तानुसार, वेदांतने राजकीय पक्षांना 457 कोटी रुपयांची देणगी दिली आहे, त्यापैकी 155 कोटी रुपये यावर्षी जारी करण्यात आले आहेत.

अलिकडच्या वर्षांत, राजकीय पक्षांना बहुतेक देणग्या 2018 मध्ये लॉन्च झालेल्या निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. ADR अहवालानुसार, 2018-2022 दरम्यान निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना 13,791 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

इलेक्ट्रॉल बाँडवर आक्षेप

राजकीय पक्षांना इलेक्ट्रॉल बाँडच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या निधीवर अनेकदा आक्षेप घेण्यात आला आहे. इलेक्ट्ऱॉल बाँडच्या माध्यमातून मिळणारा निधी सत्ताधाऱ्यांना अधिक मिळतो. त्याशिवाय, या पारदर्शकता नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टातही याला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget