Swiggy Order: स्विगीवरून ऑनलाईन जेवण ऑर्डर केलं, त्यामध्ये औषधाचं पाकिट सापडलं, मुंबईतील 152 वर्षे जुन्या कॅफेवर नेटकऱ्यांचा संताप
Online Food Controvercy : मुंबईतील एका व्यक्तीने स्विगीवरून जेवण ऑर्डर केली होती. त्याच्या जेवणाच्या ऑर्डरमध्ये औषध असल्याचं दिसून आलं. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक कमेंट्स आल्या आहेत.
मुंबई: एका व्यक्तीने ऑनलाईन जेवण ऑर्डर (Online Food Order) केल्यावर त्याची निराशा झाली. त्या व्यक्तीने स्विगी या ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून (Swiggy Order) मुंबईतील 152 वर्ष जुन्या प्रसिद्ध कॅफेमधून जेवण ऑर्डर केले होते. त्याच्या ऑर्डरमध्ये औषधही सापडले. यानंतर त्याने त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. आपल्याला या ख्रिसमस गिफ्टची अपेक्षा नव्हती असेही त्या व्यक्तीने लिहिलंय.
ऑर्डरमध्ये औषधाचे पाकीट सापडले
मुंबईतील शेफ उज्ज्वल पुरी यांनी मुंबईच्या एका प्रसिद्ध कॅफेमधून ऑयस्टर सॉस चिकन ऑर्डर केले होते. ही ऑर्डर त्यांनी उघडली असता त्यामध्ये औषधाच्या गोळ्यांचे पाकीट असल्याचं दिसलं. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. या ऑर्डरसोबत अर्धवट शिजवलेले औषधही दिलं असल्याचं त्यांनी म्हटलं.
My Mumbai Christmas Surprise ordered food from Swiggy from Leopold Colaba got this half cooked medicine in my food @Swiggy pic.twitter.com/ZKU30LzDhi
— Ujwal Puri // ompsyram.eth 🦉 (@ompsyram) December 24, 2023
स्विगीची प्रतिक्रिया
सोशल मीडियावर अनेकांनी ही पोस्ट शेअर केली असून त्यावर अनेक कमेंट्सही करण्यात आल्या. यानंतर स्विगीने लगेचच या पोस्टवर प्रतिक्रिया दिली. तुमचा मेसेज आम्हाला मिळाला आहे, असे त्यांनी लिहिले. याबाबत आम्ही तपास करत आहोत. आम्हाला आमच्या पार्टनर रेस्टॉरंटकडून चांगल्या अपेक्षा आहेत. आम्हाला थोडा वेळ द्या, या संदर्भात संपूर्ण माहिती देता येईल असं स्विगीने म्हटलंय.
We expect better from our restaurant partners, Ujwal. Do allow us a moment while we look into this.
— Swiggy Cares (@SwiggyCares) December 24, 2023
^Nish
सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर
यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आला. एका यूजरने लिहिलं की, अर्धवट शिजवलेले औषध का पाठवले? कृपया रेस्टॉरंटला ते व्यवस्थित शिजवण्यास सांगा. आणखी एका युजरने लिहिले की, हे अन्न खाल्ल्यानंतर तुम्हाला औषधाची गरज भासेल हे त्याला माहीत होते. त्यामुळे तुमच्या अन्नाची आणि आरोग्याची काळजी घेत त्यांनी सोबत औषधेही पाठवली आहेत.
स्विगीला दोष देऊ नका
काही यूजर्सनी स्विगीला दोष देऊ नका असे आवाहन केले. रेस्टॉरंटमध्ये जेवण तयार केले जाते. स्विगीने प्रत्येक पॅकेट उघडून ते तपासावे असे तुम्हाला वाटते का? एका यूजरने त्या कॅफेच्या घसरत्या गुणवत्तेला दोष दिला.
ही बातमी वाचा: