Tata-Haldiram Deal: हल्दीराममधील भागभांडवल विकत घेण्याचं वृत्त टाटा समुहानं फेटाळलं, 82 हजार कोटींच्या कंपनीचा इतिहास काय?
Tata-Haldiram Deal : टाटा समूह हल्दीराममधील मोठं भागभांडवल खरेदी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच टाटा समुहानं मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे.
Tata-Haldiram Deal : टाटा समूह (Tata Group) भारतातील प्रसिद्ध स्नॅक्स निर्माता कंपनी हल्दीराममधील (Haldiram) 51 टक्के बहुसंख्य भागभांडवल विकत घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच टाटा समुहानं मात्र हे वृत्त फेटाळलं आहे. बुधवारी, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स ही समूह कंपनी हल्दीराममधील मोठा हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत असून दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं वृत्त चर्चेत होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हल्दीरामचे मूल्यांकन सुमारे 10 अब्ज डॉलर्स असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, आता या सर्व चर्चांना पूर्णविराम देत टाटा समुहानं हे वृत्त फेटाळलं असून याबाबत आपली बाजू स्पष्ट केली आहे.
टाटा समुहानं वृत्त फेटाळलं
रॉयटर्स वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये टाटा कंझ्युमरची हल्दीराममधील हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. तसेच, टाटा समुह हल्दीराममधील तब्बल 51 टक्के भागभांडवल खरेदी करणार असल्याचं म्हटलं होतं. तसेच, टाटांनी हे भागभांडवल खरेदी केल्यानंतर हल्दीराम टाटा कंज्यूमरच्या पोर्टफोलियोमध्ये सहभागी होणार असल्याचा दावाही या वृत्तामधून करण्यात आला होता. परंतु, टाटा समुहानं हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. तसेच, यासंदर्भात आपली बाजू स्पष्ट केली आहे. टाटा समुहाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे की, अशाप्रकराच्या कोणत्याही चर्चा सुरू नाहीत.
टाटा समुहाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे की, Tata Consumer Products सध्या सुरू असलेल्या कोणत्याही शक्यतांच्या वृत्तावर टीप्पणी करू शकत नाही. दुसरीकडे, हल्दीरामच्या वतीनंही यासंदर्भात कोणतीही टीप्पणी करण्यात आलेली नाही. तसेच, यावर बोलण्यास स्पष्ट नकार देण्यात आला आहे.
भारतीयांसह जगभरातील ग्राहकांची हल्दीरामला पसंती
हल्दीराम ही भुजिया, नमकीन आणि मिठाई बनवणारी कंपनी सुमारे 85 वर्षांपूर्वी 1937 मध्ये सुरू झाली होती, मात्र या क्षेत्रात दीर्घकाळ आपला दबदबा कायम ठेवणारी ही कंपनी आता विकली जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. रॉयटर्सच्या अहवालानुसार, टाटा कंझ्युमर हल्दीराममधील मोठा 51 टक्के भागभांडवल खरेदी करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, आतापर्यंत टाटा ग्रुप किंवा हल्दीराम कंपनीकडून याबाबत कोणतंही वक्तव्य किंवा अधिकृत टीप्पणी करण्यात आलेली नाही.
देशात 150 हून अधिक रेस्टॉरंट्स
युरोमॉनिटर इंटरनॅशनलच्या मते, भारतातील स्नॅक्स मार्केट सुमारे 6.2 डॉलर अब्ज आहे आणि हल्दीरामचा या मार्केटमध्ये सुमारे 13 टक्के इतका वाटा आहे. या व्यतिरिक्त पेप्सीचेही (Pepsi) या मार्केटवर वर्चस्व आहे असून त्यांचं Lays चिप्सचा 12 टक्के वाटा आहे. हल्दीरामच्या उत्पादनांना केवळ भारतातच नाही तर सिंगापूर आणि यूएसए सारख्या परदेशी बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. कंपनीचे जवळपास 150 रेस्टॉरंट आहेत जे स्थानिक खाद्यपदार्थ, मिठाई आणि पाश्चात्य पदार्थ विकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :