एक्स्प्लोर

स्विगीने IPO साठी केलं महत्त्वाचं काम, अमिताभ बच्चन, माधुरीनंतर आता तुमच्यावरही पडू शकतो पैशांचा पाऊस!

सध्या आगामी काळात येणाऱ्या स्विगीच्या आयपीओची सगळीकडे चर्चा होत आहे. याच आयपीओसंदर्भात स्विगीने महत्त्वाचे काम केले आहे.

Swiggy IPO: बजाज हाऊसिंग फायनान्स, पु. ना. गाडगीळ या कंपन्यांच्या आयपीओंनी गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न्स दिले आहेत. याच कारणामुळे सध्या आगामी आयपीओंकडे गुंतवणूकदरांचे लक्ष लागले आहे. फुड डिलिव्हरी क्षेत्रात काम करणाऱ्या स्विगी या कंपनीचाही मोठा आयपीओ येणार आहे. या कंपनीचा आयपीओ येण्याआधीच यामध्ये दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन, दिग्दर्शक करण जोहर, माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी गुंतवणूक केलेली आहे. म्हणूच हा आयपीओ गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता या कंपनीने आपला आयपीओ घेऊन येण्यासाठी एक महत्त्वाचे काम केले आहे. त्यामुळे आता लवकरच या आयपीओसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा, किंमत पट्टा समोर येणार आहे. 

स्विगी या ऑनलाईन फुड डिलिव्हरी कंपनीने अखेर भांडवली बाजार नियमाक सेबीकडे आयपीओसाठी अर्ज केला आहे. या कंपनीने आयीओसाठीचे पेपर्स सेबीकडे सोपवले आहेत. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होऊ शकतो. या आयपीओच्या माध्यमातून 3750 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. तर सध्याच्या शेअरहोल्डर्सकडून  18.52 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे. फूड डिलीव्हरी सेगमेंटमध्ये लिस्ट होणारा हा दुसरा आयपीओ असू शकतो. याआधी या क्षेत्रात झोमॅटो या फुड लिलिव्हरी कंपनीचा आयपीओ आला होता. 

Swiggy मध्ये कोणकोणते गुंतवणूकदार?

स्विगी या कंपनीत प्रोसुस (32 टक्के), सॉफ्टबँक (8 टक्के), एक्सेल (6 टक्के) हे प्रमुख गुंतवणूकदार आहेत. या कंपनीत एलिव्हेशन कॅपिटल, डीएसटी ग्लोबल, नॉरवेस्ट, टेनसेंट, कतर इन्वेस्टमेंट अथॉरिटी, सिंगापूरची  जीआयसी या कंपन्यांनीदेखील स्विगीमध्ये गुंतवणूक केलेली आहे. 
मनीकंट्रोल या अर्थविषयक वृत्त देणाऱ्या संकेतस्थळानुसार स्विगी ही कंपनी आपला व्यवसाय 2030 पर्यंत 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहेत. आयपीओच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या पैशांतून ही कंपनी कॉमर्स सेगमेंटचा विस्तार करण्यासाठी तसेच इन्फ्रास्टक्चर आणखी मजबूत करण्यासाठी केला जाणार आहे. 

माधुरी दीक्षितने केली कोट्यवधीची गुंतवणूक

मनीकंट्रोल या वृत्तसंकेतस्थळानुसार माधुरी दीक्षित या दिग्गज अभिनेत्रीने स्विगीमध्ये 345 रुपये प्रति शेअर्सप्रमाणे गुंतवणूक केली आहे. माधुरी दीक्षितने हा व्यवहार इनोव8 (Innov8) या कंपनीचे संस्थापक रितेश मालिक यांना सोबत घेऊन केली आहे. सेकंडरी मार्केटमध्ये हा व्यवहार करण्यात आला आहे. इनोव8 ही एक को-वर्किंग स्पेस कंपनी आहे. माधुरी दीक्षित आणि रितेश मलिक यांनी साधारण 3 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. या दोघांनाही स्विगी कंपनीत दीड-दीड कोटी रुपये लावलेले आहेत. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

मोठी बातमी! रेल्वे क्षेत्रातील 'या' दोन दिग्गज कंपन्यांना कोट्यवधींच्या वर्क ऑर्डर्स, शेअर्स घेतल्यास देणार दमदार रिटर्न्स?

अवघ्या दोन महिन्यांत होणार 35 लाख लग्न, तब्बल 4.25 लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget