Gratuity Rules : 'या' चुकीमुळे कंपनी रोखू शकते ग्रॅच्युइटीचे पैसे
मित्रांनो, तुम्ही नोकरी करताय? मग ग्रॅच्युइटीचे हे नवे नियम तुम्हाला माहिती असायलाच हवेत! आता ग्रॅच्युइटीसाठी 5 वर्ष थांबण्याची गरज नाही, 1 वर्षातही पैसे मिळू शकतात. पण तुमच्या एका चुकीमुळे कंपनी तुमचे कष्टाचे पैसे रोखू शकते.

मित्रांनो, तुम्ही नोकरी करताय? मग ग्रॅच्युइटीचे हे नवे नियम तुम्हाला माहिती असायलाच हवेत! आता ग्रॅच्युइटीसाठी 5 वर्ष थांबण्याची गरज नाही, 1 वर्षातही पैसे मिळू शकतात. पण तुमच्या एका चुकीमुळे कंपनी तुमचे कष्टाचे पैसे रोखू शकते. नक्की काय आहेत नियम? जाणून घेऊयात
आधीच्या नियमानुसार, ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी सलग 5 वर्षे काम करणे अनिवार्य होते. पण, नव्या लेबर कोडनुसार (New Labour Code), काही विशिष्ट परिस्थितींमध्ये आता केवळ 1 वर्ष काम केल्यानंतरही कर्मचारी ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरू शकतात. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
पण लक्षात ठेवा, ग्रॅच्युइटी हा तुमचा हक्क असला तरी, कंपनी ती रोखू देखील शकते. तीन कारणामुळे तुमचे पैसे रोखले जाऊ शकते.
01. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन: जर कर्मचाऱ्याने हिंसा केली, कोणाला धमकावले किंवा कंपनीच्या नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले, तर चौकशीनंतर ग्रॅच्युइटी रोखली जाऊ शकते.
02.कंपनीचे नुकसान: तुमच्या निष्काळजीपणामुळे जर कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले, तर कंपनी त्या नुकसानाची रक्कम तुमच्या ग्रॅच्युइटीमधून कापून घेऊ शकते.
03. फसवणूक किंवा गुन्हेगारी: चोरी, लाचखोरी किंवा बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास, तुमची पूर्ण ग्रॅच्युइटी जप्त होऊ शकते.
त्यामुळे नोकरी सोडताना किंवा बदलताना तुमचे रेकॉर्ड चांगले ठेवा, जेणेकरून तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला वेळेवर मिळतील.
महत्त्वाच्या बातम्या




















