एक्स्प्लोर

मोठी बातमी! रेल्वे क्षेत्रातील 'या' दोन दिग्गज कंपन्यांना कोट्यवधींच्या वर्क ऑर्डर्स, शेअर्स घेतल्यास देणार दमदार रिटर्न्स?

सध्या शेअर बाजारात अनेक कंपन्या चांगले रिटर्न्स देत आहेत. रेल्वे क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या कंपन्यांना मोठ्या वर्क ऑर्डर्स मिळाल्या आहेत, त्यामुळे या कंपन्यादेखील चांगले रिटर्न्स देण्याची शक्यता आहे.

Railway PSU Stocks : सध्या शेअर बाजारात चांगलीच तेजी आली आहे. अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिेत आहेत. रेल्वे क्षेत्रात काम करणाऱ्या काही कंपन्यांचाही यामध्ये समाावेश आहे. भारतीय रेल्वेसाठी काम करणाऱ्या रेलटेल कॉर्पोरेशन आणि रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिस (RITES) या दोन कंपन्यादेखील भविष्यात आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देण्याची शक्यता आहे. कारण या दोन्ही कंपन्यांना नुकतेच कोट्यवधी रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार Railtel या कंपनीला नुकतेच 156 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. तर Rites लिमिटेड या कंपनीलादेखील दिल्ली मेट्रोकडून 88 कोटी रुपयांची एक ऑर्डर मिळाली आहे. याच कारणामुळे हे दोन्ही स्टॉक्स भविष्यात चांगली कामगिरी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

RITES कंपनीला नेमकी कशाची ऑर्डर मिळाली? 

RITES Ltd ही कंपनी रेल्वेच्या वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करते. या कंपनीला दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून 87.58 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर मिळाली आहे. खरं पाहता राईट्स लिमिटेड या कंपनीशी संबंधित असलेल्या एका उपकंपनीला ही वर्क ऑर्डर मिळाली आहे. या अपकंपनीत राईट्स या कंपनीची 49 टक्के हिस्सेदारी आहे. म्हणजेच एकूण 87.58  कोटी रुपयांच्या ऑर्डरपैकी साधारण 42.91 कोटी रुपयांची ऑर्डर राईट्स या कंपनीला मिळेल. आगामी तीन वर्षांत या वर्क ऑर्डरला पूर्ण करावं लागणार आहे. गुरुवारी या कंपनीचा शेअर 365 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका आठवड्यात हा शेअर 7 टक्क्यांनी तर दोन आठवड्यांत 8 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. 

RailTel कंपनीला नेमकी कशाची ऑर्डर मिळाली? 

RailTel ही कंपनी रेल्वेसाठी टेलकॉम सेवा पुरवते. RailTel Corporation या कंपनीलादेखील गुरुवारी भांडवली बाजार बंद झाल्यानंतर मोठी वर्क ऑर्डर मिळाली. या कंपनीला ग्रामीण विकास विभागाकडून 155.71 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. याआधी या कंपनीला हेल्थ इंडिया इन्सुरन्स या कंपनीकडून  48.7 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली होता. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता, 2 कोटी 40 लाख महिलांच्या अर्जांना मंजुरी

अवघ्या दोन महिन्यांत होणार 35 लाख लग्न, तब्बल 4.25 लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget