एक्स्प्लोर

Best Selling Car : SUV च्या लाटेतही मारुती 'डिझायर'चा जलवा कायम; ठरली देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार

Best Selling Car : नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, मारुती डिझायर ही २०२५-२६ या आर्थिक वर्षात भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी कार ठरली आहे.

नवी दिल्ली: भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सध्या एसयूव्ही (SUV) गाड्यांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. मात्र, या स्पर्धेतही मारुती सुझुकीच्या 'डिझायर' (Maruti Dzire) या कॉम्पॅक्ट सेडान गाडीने आपले अव्वल स्थान टिकवून धरले आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, मारुती डिझायर ही २०२५-२६ या आर्थिक वर्षात भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी कार ठरली आहे. (Maruti Dzire Best Selling Car India 2026)

Best Selling Car : विक्रीचा नवा विक्रम

२०२५ या वर्षात मारुती डिझायरने (Maruti Dzire Best Selling Car India 2026) विक्रीचा मोठा टप्पा ओलांडला असून, वर्षभरात सुमारे २,१४,००० युनिट्सची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे, एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या ११ महिन्यांच्या कालावधीतच २,०७,००० हून अधिक गाड्या ग्राहकांनी खरेदी केल्या आहेत. एसयूव्ही सेगमेंटमध्ये नवनवीन गाड्या लाँच होत असतानाही सेडान सेगमेंटमधील डिझायरची ही कामगिरी ऑटो क्षेत्राला थक्क करणारी आहे. Maruti Dzire Best Selling Car India 2026

Best Selling Car : २००८ पासूनचा यशस्वी प्रवास

मारुती डिझायर भारतीय रस्त्यांवर पहिल्यांदा २००८ मध्ये धावू लागली. त्यावेळी ही गाडी पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध होती. आपल्या प्रशस्त डिझाइन, मायलेज आणि कमी देखभाल खर्चामुळे (Maintenance) ही गाडी अल्पावधीतच मध्यमवर्गीय कुटुंबांची आणि कमर्शियल टॅक्सी व्यवसायाची पहिली पसंती बनली. (Maruti Dzire Best Selling Car India 2026)

Best Selling Car : बदलेली इंजिन प्रणाली आणि किंमत

काळाप्रमाणे मारुतीने या गाडीत अनेक बदल केले आहेत. सध्या ही गाडी फक्त पेट्रोल आणि सीएनजी (CNG) पर्यायामध्ये उपलब्ध आहे. कंपनीने डिझेल इंजिन बंद केले असले तरी, सीएनजी व्हेरियंटला ग्राहकांकडून मोठी मागणी मिळत आहे. (Maruti Dzire Best Selling Car India 2026)

Best Selling Car : किंमत

सध्या भारतीय बाजारपेठेत या गाडीची एक्स-शोरूम किंमत ६.५७ लाख रुपयांपासून सुरू होऊन ९.३९ लाख रुपयांपर्यंत जाते.

Best Selling Car : यशाचे नेमके कारण काय?

तज्ज्ञांच्या मते, मारुती सुझुकीचे विस्तीर्ण सर्व्हिस नेटवर्क, गाडीचे उत्तम मायलेज आणि उत्तम रिसेल व्हॅल्यू (पुनर्विक्री मूल्य) यामुळे डिझायर आजही ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. नवीन पिढीतील डिझायरमध्ये देण्यात आलेले आधुनिक फीचर्स आणि सुरक्षिततेच्या सोयी यामुळे तरुणांमध्येही या गाडीची क्रेझ कायम आहे.(Maruti Dzire Best Selling Car India 2026)
 
महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget