बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतातील शेतकऱ्यांना मोठा फटका, शेकडो ट्रक कांदा सिमेवर, राजू शेट्टींचं पंतप्रधान मोदींना पत्र
बांगलादेशातील अराजकतेचा फटका भारतीय शेतकऱ्यांना बसत आहे. बांगलादेशमध्ये भारतातून होत असलेली शेतमालाची निर्यात (Export of agricultural produce) थांबली आहे.
![बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतातील शेतकऱ्यांना मोठा फटका, शेकडो ट्रक कांदा सिमेवर, राजू शेट्टींचं पंतप्रधान मोदींना पत्र Farmers hit hard by violence in Bangladesh Large quantity of onion on India Bangladesh border Raju Shetti letter to Prime Minister Narendra Modi बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतातील शेतकऱ्यांना मोठा फटका, शेकडो ट्रक कांदा सिमेवर, राजू शेट्टींचं पंतप्रधान मोदींना पत्र](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/07/7c08151c1523f54503e8dc2cc88d55c01723008492848339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India-Bangladesh Onion Trade : बांगलादेशातील अराजकतेनंतर (Bangladesh Violence) या देशासह भारताने आपल्या सीमा सील केल्या आहेत. बांगलादेशमध्ये भारतातून होत असलेली शेतमालाची निर्यात (Export of agricultural produce) थांबली आहे. बांगलादेश भारताकडून जवळपास 75 टक्के शेतमाल आयात करत असल्यानं या घडामोडींनी दोन्ही देशांचे नुकसान होणार आहे. नाशिकमधून दररोज कांद्याचे 70 ते 80 ट्रक बांगलादेशला रवाना होतात. नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर थांबले आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
कांदा कमी भावात कोलकात्यातच विकण्याची नामुष्की येण्याची शक्यता
एका ट्रकमध्ये 30 टन कांदा भरला जातो. मात्र, कांद्याची वाहतूक थांबली असल्याचे कांदा निर्यातदारांनी सांगितले. मागील आठवड्यात बांगलादेशकडे रवाना झालेले कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर अडकून पडले आहेत. हा कांदा कमी भावात कोलकात्यातच विकण्याची नामुष्की ओढवू शकते. 50 हजार टन कांद्याचा टप्पा पार करण्यापर्यंत भारतातील कांदा निर्यातदार व शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. यातील 85 टक्के कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यातून जाणार होता. मात्र, सध्या सीमा केल्या असल्याने कांद्याचे ट्रक जागच्या जागी थांबले आहेत. कांद्याची सर्वाधिक निर्यात थांबल्यानं रोजचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार थांबले आहेत.
बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारशी बोलणी करा, राजू शेट्टींचं पंतप्रधान मोदींना पत्र
दरम्यान, याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं आहे. बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळं भारताची दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे. दळणवळण होत नसल्यानं कांद्याची वाहतूक होत नसल्याचं राजू शेट्टींनी पत्रात म्हटलं आहे. बांगलादेशच्या परिस्थितीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारशी बोलणी करुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
दोन्ही देशादरम्यान मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंची आयात-निर्यात
भारताच्या (India) शेजारील देश असणाऱ्या बांगलादेशमध्ये सध्या हिंसाचार (Bangladesh Violence) सुरु आहे. या राजकीय संघर्षामुळं पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी राजीनामा देत देश सोडला आहे. गेल्या दोन तीन दिवसात हिंसाचारात 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हिंसाचारग्रस्त बांगलादेशशी भारताचे मोठे व्यापारी संबंध आहेत. दोन्ही देश अनेक जीवनावश्यक वस्तूंची आयात-निर्यात करतात.
महत्वाच्या बातम्या:
भारतातून बांगलादेशला कोणत्या वस्तूंची निर्यात? हिंसाचाराचा व्यापारावर किती होतोय परिणाम?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)