एक्स्प्लोर

Onion Import : कांद्याची आयात थांबवा अन्यथा, मंत्र्यांच्या गाडीवर कांदे फेकू, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक 

कांद्याची आयात त्वरित धांबवा, अन्यथा मंत्र्यांच्या गाड्यांवर कांदे फेकू असा इशारा  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप (Sandip Jagtap) यांनी दिला आहे.

Swabhimani shetkari sanghatana : अफगाणिस्तानचा कांदा (Afghanistan Onion) भारतात आयात केला जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं (Swabhimani shetkari sanghatana) आक्रमक भूमिका घेतली आहे. कांद्याची आयात त्वरित धांबवा, अन्यथा मंत्र्यांच्या गाड्यांवर कांदे फेकू असा इशारा  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप (Sandeep Jagtap) यांनी दिला आहे.

सरकारनं अफगाणिस्तानातून भारतात कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कांद्याची आयात न थांबवल्यास नाशिकअहमदनगर जिल्ह्यात मंत्र्यांच्या गाड्यांवर कांदे फेकू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे..लोकसभा निवडणुकीत कांदा मुद्द्यावर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागले होते. आता विधानसभेच्या तोंडावर पुन्हा अफगाणिस्तानचा कांदा सरकार आयात करतय. याचा अर्थ सुंभ जळला पण पिळ गेला नाही अशी टीका जगताप यांनी सरकारवर केली आहे.

शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे येत असताना कांदा आयातीचा निर्णय

सध्या कांद्याचे दर वाढत आहेत. यामुळं शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे येत आहेत. अशा स्थितीतच सरकारने अफगाणिस्तानचा लाल कांदा आयात केला आहे. भारतात कांद्याचे वाढत असलेले दर अन् अफगानिस्तानमध्ये घसरलेले दर याचा फायदा घेत खासगी व्यापारी कांदा भारतात आणून मालामाल बनू पाहत आहेत. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळं शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून अफगाणिस्तानमधून कांदा आयात

कांद्याचा बाजारभाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने अफगाणिस्तानमधून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राने अफगाणिस्तानातून कांदा आयातीला सुरुवात ही केली असून पंजाबमधील अमृतसर, जालंधर शहरांमध्ये जवळपास 300 टन कांदा आयात करण्यात आला आहे. तसेच सीमेवर आणखी 50 ट्रकमध्ये तब्बल 1500 टन कांदा देशातील बाजारात येण्यासाठी तयार आहे. अफगाणिस्तानचा कांदा बाजारात आल्यास महाराष्ट्रातील कांद्याची मागणी काही प्रमाणात घटणार असून कांद्याचे दर 10  ते 20 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच केंद्राने अफगाणिस्तानातून कांदा आयात सुरू केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने कांदा आयातीवर बंदी घालण्याची मागणी केली जात असून कांदा आयातीवर बंदी न घातल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

शेतमालाचे दर वाढले की सरकारच्या पोटात गोळा येतो, कांद्याच्या आयातीवरुन जयंत पाटलांचा हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

70 दिवसांनंतर सोन्यानं केला नवा विक्रम, 5 दिवसात दरात 2900 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर काय?
70 दिवसांनंतर सोन्यानं केला नवा विक्रम, 5 दिवसात दरात 2900 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर काय?
Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापुरात; विद्यमान आमदार भाजपच्या गळाला! प्रदेश उपाध्यक्ष कोणती भूमिका घेणार?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापुरात; विद्यमान आमदार भाजपच्या गळाला! प्रदेश उपाध्यक्ष कोणती भूमिका घेणार?
कृषीमंत्री धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान? परळी मतदारसंघातून या आमदाराच्या जावयाचं नाव उमेदवारीसाठी पुढं
कृषीमंत्री धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान? परळी मतदारसंघातून या आमदाराच्या जावयाचं नाव उमेदवारीसाठी पुढं
Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद, शुक्रवारीही कमी दाबाने येणार पाणी
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद, शुक्रवारीही कमी दाबाने येणार पाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur :  इमारत बांधकाम कामगार कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्दी, साहित्य वितरण केंद्रावर रांगाChandrashekhar Bawankule :महालक्ष्मी जगदंबा संस्थानला महाविद्यालय, नर्सिंग होम सुरू करण्यासाठी भूखंडNandurbar : आदिवासी नेत्यांनी भाजप, शिवसेनेची उमेदवारी घेऊ नये : वळवीABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM : 25 Sept 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
70 दिवसांनंतर सोन्यानं केला नवा विक्रम, 5 दिवसात दरात 2900 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर काय?
70 दिवसांनंतर सोन्यानं केला नवा विक्रम, 5 दिवसात दरात 2900 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर काय?
Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापुरात; विद्यमान आमदार भाजपच्या गळाला! प्रदेश उपाध्यक्ष कोणती भूमिका घेणार?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापुरात; विद्यमान आमदार भाजपच्या गळाला! प्रदेश उपाध्यक्ष कोणती भूमिका घेणार?
कृषीमंत्री धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान? परळी मतदारसंघातून या आमदाराच्या जावयाचं नाव उमेदवारीसाठी पुढं
कृषीमंत्री धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान? परळी मतदारसंघातून या आमदाराच्या जावयाचं नाव उमेदवारीसाठी पुढं
Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद, शुक्रवारीही कमी दाबाने येणार पाणी
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद, शुक्रवारीही कमी दाबाने येणार पाणी
Bank Holidays : दसरा दिवाळी ते गांधी जयंती, ऑक्टोबरमध्ये 1, 2, 3 नाहीतर तब्बल एवढ्या दिवस बॅंका राहणार बंद, यादी तपासा मगच घराबाहेर पडा
दसरा दिवाळी ते गांधी जयंती, ऑक्टोबरमध्ये 1, 2, 3 नाहीतर तब्बल एवढ्या दिवस बॅंका राहणार बंद, यादी तपासा मगच घराबाहेर पडा
Amit Shah: मराठवाडा-विदर्भासाठी अमित शाहांचं मायक्रो प्लॅनिंग; भाजपच्या कार्यकर्त्यांना म्हणाले, आपल्याला शरद पवारांना रोखायचंय
अमित शाहांनी बैठकीत भाजपच्या नेत्यांना टार्गेट स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आपल्याला शरद पवारांना रोखायचंय!
Beed: ज्ञानराधा मल्टीस्टेटवर ईडीची मोठी कारवाई, राज्यातील 4 शाखांमधील तब्बल 95 कोटींची संपत्ती जप्त 
ज्ञानराधा मल्टीस्टेटवर ईडीची मोठी कारवाई, राज्यातील 4 शाखांमधील तब्बल 95 कोटींची संपत्ती जप्त 
Padmakar Valvi: 'आदिवासी क्षेत्रातून शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपाला हद्दपार करा', काँग्रेसमधून नुकतेच भाजपात आलेल्या नेत्याचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
'आदिवासी क्षेत्रातून शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपाला हद्दपार करा', काँग्रेसमधून नुकतेच भाजपात आलेल्या नेत्याचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Embed widget