(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'या' पाच शेअर्सचा विषय खोल, पैसे गुंतवल्यास मिळू शकतात तब्बल 'इतके' टक्के रिटर्न्स!
शेरखान या ब्रोकरेज कंपनीने पाच स्टॉक सुचवले आहेत. या पाच स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगला परतावा मिळू शकतो, असा दावा शेरखानने केलाय.
मुंबई : सध्या विदेशी भांडवली बाजारात (Share Market) चांगली स्थिती दिसून येत आहे. याच कारणामुळे भारताच्या भांडवली बाजारातही चढ-उतार पाहायला मिळतोय. सध्या अनेक कंपन्या आपला मार्च महिन्याचा तिमाही निकाल जाहीर करत आहेत. त्यामुळेदेखील सध्या बाजारात मोठ्या घडामोडी घडताना दिसतायत. दरम्यान, तिमाही निकालाच्या माध्यमातून अनेक कंपन्यांची नेमकी कामगिरी समजत असताना ब्रोकरेज फर्म शेरखानने (Sharekhan) पाच निवडक स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आगामी 12 महिन्यांचा विचार करून शेरखानने हे स्टॉक सांगितले आहेत. यामध्ये Blue Star, Titan Company, Federal Bank, GSPL, Apl Apollo Tubes या कंपन्यांचा समावेश आहे. पुढच्या एका वर्षात या कंपन्या आपल्या गुंतणूकदारांना जास्तीत जास्त 51 टक्के रिटर्न देण्याची शक्यता शेरखानने व्यक्त केली आहे.
Blue Star
शेरखान या ब्रोकरेज फर्मने Blue Star या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर खरेदी करत असाल तर टार्गेट 1670 रुपये प्रति शेअर ठेवायला हवे. 6 मे 2024 रोजी या शेअरचा भाव 1459 रुपये होता. आगामी काळात या शेअरमधून 14 टक्के रिटर्न्स मिळू शकतात, असा दावा शेरखानने केला आहे.
Titan Company
शेरखानने Titan Company कंपनीचे शेअरही खरेदी करण्याचा सल्ला दिला असून त्यासाठी टार्गेट प्राईस 3990 रुपये प्रति शेअर ठेवावे असे शेरखानने सुचवले आहे. 6 मे 2024 रोजी या शेअरचे मूल्य 3,284 रुये होते. या शेअरच्या माध्यमातून आगामी काळात 21 टक्के रिटर्न्स मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Federal Bank
शेरखानने Federal Bank चे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. शेअर खरेदी करत असाल टार्गेट 190 रुपये प्रति शेअर ठेवावे. 6 मे 2024 रोजी या शेअरचा भाव 163 रुपये होता. या कंपनीत गुंतवणूक केल्यास भविष्यात 16 टक्के रिटर्न्स मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आले.
GSPL
शेरखानने GSPL चे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. या कंपनीचे शेअर्स खरेदी करत असाल तर 440 रुपयांचे टार्गेट ठेवावे. 6 मे 2024 रोजी या शेअरचे मूल्य 292 रुपये होते. या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात 51 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स मिळू शकतात असा दावा शेरखानने केलाय.
Apl Apollo Tubes
शेरखानने Apl Apollo Tubes या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला असून टार्गेट प्राईस 2000 रुपये प्रति शेअर ठेवावे, अस शेरखानने सांगितले आहे. 6 मे 2024 रोजी या शेअरचे मूल्य 1,561 रुपये होते. आगामी काळात हा शेअर 28 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स देऊ शकतो, असा दावा शेरखानने केलाय.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
जगातील कोणत्या देशाकडे आहे सर्वाधिक सोनं, भारताच्या सरकारी खजान्यात किती टन सोनं?
निवडणूक संपताच सामान्यांच्या खिशाला बसणार झळ? मोबाईलचा डेटा पॅक महागणार?
'हे' पाच स्टॉक घ्या अन् खोऱ्याने पैसे ओढा, वर्षभरासाठी होल्ड केल्यास होऊ शकता मालामाल!