एक्स्प्लोर

निवडणूक संपताच सामान्यांच्या खिशाला बसणार झळ? मोबाईलचा डेटा पॅक महागणार?

येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. ही निवडणूक संपल्यानंतर देशातील टेलिकॉम कंपन्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. लवकरच मोबाईल डेटा पॅक महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) होत आहे. 4 जून 2024 रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार असून त्यानंतर सामान्य माणसाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. निकालानंतर मोबाईलचे रिचार्ज (Mobile Recharge) महागण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर 2021 नंतर टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅनमध्ये वाढ केलेली नाही. मात्र निवडणूक संपताच या मोबाईलच्या डेटा पॅकमध्ये साधारण 20 ते 25 टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोबाईल डेटा महागणार 

बीओएफए सेक्युरिटीज (Bofa Securities ) ने नुकतेच देशातील टेलिकॉम क्षेत्रावर आधारित एक रिसर्च पेपर जारी केला आहे. या रिसर्च रिपोर्टमध्ये आगामीक काळात टेलिकॉम सेक्टरमध्ये अनेक सकारात्मक घडामोडी घडणार आहेत. लवकरच 20 ते 25 टक्के मोबाईल डेटा पॅक महागण्याची शक्यता आहे. याआधी या बीओएएफ सेक्युरिटीजने मोबाईल डेटा पॅक 10 ते 15 टक्के महागण्याची शक्यता व्यक्त केली होती. डेटा पॅक वाढवून टेलिकॉम कंपन्या फायबर ब्रॉडबँड, एंटराप्रयजेस, डेटा सेंटर ऑफरिंग यांच्यात गुंतवणूक करू शकतात. लवकरच रिलायन्स इंडस्ट्रिजची टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी जिओचा आयपीओ ( REliance Jio IPO) येण्याची शक्यता आहे. यामुळेदेखील टेलिकॉम क्षेत्रात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीनंतर निर्णय होण्याची शक्यता 

आगामी काळात मोबाईल डेटा पॅक महागण्याची शक्यता बीओएएफने व्यक्त केली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी डेटा आपापल्या डेटा पॅकमध्ये वाढ केली होती. तसाच प्रकार निवडणुकीनंतर घडण्याची शक्यता बीओएएफने व्यक्त केली आहे. ग्राहकांना 20 ते 25 टक्क टेरिफ प्लॅन्समध्ये वाढीची झळ बसू शकते. 4 जून 2024 रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर टेरिफ प्लॅन्सवर निर्णय होण्याची शक्यता आहे. बीओएएफ ने जारी केलेल्या रिपोर्टनुसार डेटा पॅक एकदा महागल्यानंतर हळूहळू ग्राहकांना त्याची सवय होते. टेलिकॉम कंपन्यांनी 5जी (5G) सेवा देण्यासाठी मोठा खर्च केलेला आहे. काही कंपन्या आजही ट्रायल बेसेसवर मोफत 5 जी डेटा देतात. हाच खर्च वसूल करण्यासाठी कंपन्या आगामी काळात टेरिफ प्लॅन्स वाढवण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास लवकरच सामान्यांच्या खिशाल मोठी झळ बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

चिंता सोडा! तज्ज्ञांनी सांगितलेले 'या' सहा कंपन्यांचे शेअर खरेदी करा अन् व्हा मालामाल!

'या' कंपनीचा शेअर गडगडला अन् रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत तब्बल 1170 कोटींची घट!

'हे' पाच स्टॉक घ्या अन् खोऱ्याने पैसे ओढा, वर्षभरासाठी होल्ड केल्यास होऊ शकता मालामाल!

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Embed widget