एक्स्प्लोर

Stock Market : रशिया-युक्रेनमध्ये घनघोर युद्ध; शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला

Stock Market Updates : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह सुरू झाला. सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला.

Stock Market : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय तणावाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारही त्याला अपवाद ठरत नसल्याचे दिसत आहे.  आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला आहे. सेन्सेक्स 529 अंकांनी घसरून 55329 वर,  तर निफ्टी 176 अंकांनी घसरून 16,481 अंकांवर सुरू झाला. त्यानंतरही घसरण कायम राहिली. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1009 अंकांनी कोसळला. तर, निफ्टीत 246 अंकांनी घसरण झाली.

शेअर बाजारात मेटल सेक्टर वगळता सर्वच सेक्टरमधील शेअर्स घसरले आहेत. बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार विक्री होत आहे. ऑटो, आयटी, फार्मा, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील समभागही घसरले आहेत. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही घसरण दिसून येत आहे. 

Stock Market : रशिया-युक्रेनमध्ये घनघोर युद्ध; शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी  27 शेअर्समध्ये घसरण झाली असून 3 शेअर्स वधारले आहेत. सर्वात मोठी घसरण एचडीएफसी बँकेत दिसून येत आहे. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये  2.50 टक्क्यांची घसरण झाली असून 1419 रुपयांवर व्यवहार करत आहे. पॉवरग्रीडचा शेअर दर किंचित वधारला असून 199 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. 

दरम्यान, येत्या काही दिवसांत युद्धपरिस्थिती निवळली नाही तर जागतिक बाजारपेठेसह भारतीय शेअर बाजारावर याचे आणखी विपरित परिणाम होऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आपल्या शेअर्स विक्रीचा सपाटा सुरू ठेवला आहे. 

ऑक्टोबर 2021 पासून सतत माघार
ऑक्टोबर 2021 पासून विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून सतत माघार घेत आहेत. मार्च 2020 पासून फेब्रुवारी 2022 मध्‍ये एफपीआयचा जावक सर्वाधिक आहे. त्यावेळी एफपीआयने भारतीय बाजारातून 1 लाख 18 हजार 203 कोटी रुपये काढले होते. डिपॉझिटरी डेटानुसार, एफपीआयने1 ते 25 फेब्रुवारी दरम्यान इक्विटीमधून 31 हजार 158 कोटी रुपये आणि कर्ज विभागातून 4 हजार 467 कोटी रुपये काढले. यादरम्यान त्यांनी हायब्रीड उपकरणांमध्ये 120 कोटींची गुंतवणूक केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget