एक्स्प्लोर

Stock Market Updates : शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स 1000 हून अधिक अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फायदा

Sensex Stock Market Updates : शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर दिसून आला. बाजारात बँकिंग आणि स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली.

Share Market :  मागील आठवड्यात पडझड झालेला शेअर बाजार (Share Market) आज आठवड्यातील पहिल्याच दिवशी वधारला. गुंतवणूकदारांनी आज सकाळपासूनच खरेदीचा सपाटा लावल्याने बाजारात तेजी दिसून आली. बँकिंग आणि इतर मोठ्या कंपन्यांचे शेअर दर वधारल्याने बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी 50 (Nifty) हे दोन्ही निर्देशांक आज दीड टक्क्यांहून अधिक तेजीसह  बंद झाले. 

आजच्या तेजीने आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज  6 लाख कोटी रुपयांनी वाढ झाली. आज निफ्टी निर्देशांकातील 40 आणि सेन्सेक्सवरील 25 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. आज बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 1241 अंकांच्या उसळीसह 71,942 अंकांवर, तर निफ्टी निर्देशांक 387 अंकांच्या तेजीसह 21,740 अंकांवर स्थिरावला. 

इंडेक्‍स  किती अंकांवर बंद दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल?
BSE Sensex 71,941.57 72,010.22 70,880.54 1.76%
BSE SmallCap 44,819.28 44,875.69 44,620.07 0.01
India VIX 15.68 15.85 13.80 13.09%
NIFTY Midcap 100 47,979.05 48,003.15 47,289.80 1.63%
NIFTY Smallcap 100 15,638.55 15,654.60 15,497.00 0.01
NIfty smallcap 50 7,241.15 7,252.80 7,185.95 0.01
Nifty 100 22,041.60 22,066.75 21,744.20 1.73%
Nifty 200 11,925.90 11,937.75 11,767.65 1.72%
Nifty 50 21,737.60 21,763.25 21,429.60 1.80%

शेअर बाजार का वधारला?

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हची बुधवारी बैठक आहे.अमेरिकेतील महागाई दरांच्या आकड्यांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे व्याजदरात कपात होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकादारांमध्ये आज सकारात्मक वातावरण दिसून आले. त्याशिवाय, या आठवड्यात अंतरीम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने बाजाराला अपेक्षा आहेत. त्याच्या परिणामीदेखील गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर लावला असल्याचे म्हटले जात आहे. 

आज, आशियाई बाजारात देखील तेजी दिसून आली. त्याचे चांगले परिणाम भारतीय भांडवली बाजारावर झाले. भारतीय अर्थव्यवस्था पुढील आर्थिक वर्षात 7 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचा परिणामही शेअर बाजारावर झाला.  रिलायन्स, ओएनजीसी, अदानी एन्टरप्रायजेझ, पंजाब सिंध बॅंक, इंडियन ओव्हरसिज बॅंकेच्या समभागात मोठी उसळी दिसून आली. 

बँकिंग, ऑटो, फार्मा, धातू, ग्राहकोपयोगी वस्तू, आरोग्यसेवा आणि ऑईल अॅण्ड गॅस क्षेत्रातील शेअर्स मोठ्या तेजीसह बंद झाले. फक्त एफएमसीजी सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. आजच्या व्यवहारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागही वधारले. 

रिलायन्सचा दबदबा, फक्त 5 तासात सव्वा लाख कोटींची कमाई

 रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries Limited) शेअरच्या किंमतीमध्ये विक्रमी उच्चांक सुरुच आहे. आज (29 जानेवारी) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअरच्या किंमतींनी उच्चांक गाठला. एका बाजूने शेअर किंमती वाढत असतानाच कंपनीचे (Reliance Industries) मार्केट कॅप सुद्धा 19.50 लाख कोटी रुपयांवर पोहोचले.  रिलायन्सच्या शेअर्सनी बीएसईवर 7 टक्क्यांच्या वाढीसह 2897.40 रुपयांचा नवा उच्चांक गाठला. बीएसईवर, रिलायन्सच्या शेअरची किंमत 6.90 टक्क्यांनी वाढून 2897.40 या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. दुसरीकडे, निफ्टी 50 इंडेक्सवर RIL स्टॉक टॉप गेनर राहिला.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding: लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृती मानधनाच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृतीच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding: लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृती मानधनाच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृतीच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
Embed widget