Share Market Updates : शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, सेन्सेक्स 350अंकानी घसरला
Share Market Updates : जागतिक पातळीवर शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. सेन्सेक्समध्ये 350 अंकाची घसरण झाली.
Share Market Updates : मंगळवारी चांगली तेजी दाखवल्यानंतर आज बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. शेअर बाजारात आज प्री-ओपनिंग सत्रात, सेन्सेक्समध्ये 350 अंकाची घसरण झाली. तर, निफ्टी निर्देशांक 17100 अंकाखाली आला आहे. जागतिक शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे.
मंगळवारी अमेरिका आणि आशियाई बाजारातील तेजी परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला होता. भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली. आज, बुधवारी अमेरिकन शेअर बाजारावर अमेरिकेतील शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. चीनमधील कोरोना परिस्थिती, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून होणारी संभाव्य व्याज दरवाढ आणि अर्थव्यवस्थेबाबत व्यक्त होत असलेली चिंता याच्या परिणामी अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाली.
निफ्टीतील 50 पैकी फक्त 9 शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. तर 41 शेअर्समध्ये घसरण दिसत आहे. बँक निफ्टीमध्ये पुन्हा एकदा घसरण दिसून येत आहे. बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच बँक निफ्टीत 300 अंकांनी घसरला.
आज मीडिया आणि मेटल क्षेत्रातील स्टॉक्स वगळता इतर क्षेत्रात घसरण दिसत आहे. आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये 1.04 टक्के घसरण दिसत आहे. ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये 0.88 टक्क्यांची घसरण दिसत आहे. वित्तीय सेवांमधील शेअर्समध्येही एक टक्क्यांची घसरण दिसत आहे.
रुपयाची घसरण
आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याचे दिसून आले. रुपयामध्ये 9 पैशांची घसरण झाली. आज रुपया डॉलरच्या तुलनेत 76.67 रुपयांवर उघडला. मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 76.58 रुपये इतकी होती.
मंगळवारी शेअर बाजाराची स्थिती काय?
मंगळवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 776 अंकांनी वधारला होता. तर निफ्टीही 246 अंकानी वधारला. सेन्सेक्समध्ये 1.37 टक्क्यांची वाढ होऊन तो 57,356 अंकावर बंद झाला. तर निफ्टीमध्ये 1.46 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,200 वर पोहोचला होता. मंगळवारी 1886 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1422 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 108 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. ऑटो, उर्जा, रिअॅलिटी क्षेत्रातल्या शेअर्समध्ये दोन ते तीन टक्क्यांची तेजी दिसून आली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Aadhaar Card : तुमचं आधार कार्ड खरं की खोटं? असं ओळखा; UIDAI ने सांगितली सोपी पद्धत
- कमाईची संधी! महाराष्ट्रातील लहान मुलांच्या वस्तू विकणारी 'फर्स्ट क्राय' आणणार आयपीओ
- LIC IPO : एलआयसी आयपीओचा मुहूर्त आणि 'किंमत' ठरली; पॉलिसी धारकांना 60 रुपये स्वस्त मिळणार