Aadhaar Card : तुमचं आधार कार्ड खरं की खोटं? असं ओळखा; UIDAI ने सांगितली सोपी पद्धत
Aadhaar Card Verification Online: मागील काही दिवसात बनावट आधार कार्ड तयार होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर तुमचे आधार कार्ड खरं की खोटं हे ऑनलाइन पद्धतीने पाहता येईल.
Aadhaar Card Verification Online: केंद्र सरकारने 2009 मध्ये आधार कार्ड योजना लागू केली होती. आता अनेक शासकीय योजनांसाठी आधार कार्ड, ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा वापर केला जात आहे. भारतीयांसाठी आधार कार्ड महत्त्वाचे दस्तऐवज आहे.
आधार कार्डचा वापर वाढत असताना दुसरीकडे बनावट आधार कार्डच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेता आधार कार्ड देणारी UIDAI संस्थेने बनावट आधार कार्ड कसे ओळखावे याबाबतची माहिती दिली आहे. UIDAI ने आपल्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून एक ट्वीट करत बनावट आधार कार्डच्या धोक्याबाबत इशारा दिला आहे. UIDAI ने म्हटले की, प्रत्येक 12 अंक हा आधार कार्डचा क्रमांक नसतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन UIDAI ने केले आहे.
#BewareOfFraudsters
— Aadhaar Office Delhi (@UIDAIDelhi) April 25, 2022
All 12-digit numbers are not #Aadhaar. It is recommended that the Aadhaar should be verified before accepting it as identity proof. Click: https://t.co/DwNgEcmVZ9 and verify it online in 2 simple steps. pic.twitter.com/JIT9NVpGxG
तुम्हाला खरं आणि बनावट आधार कार्ड ओळखायचे असे तर काही सोप्या पद्धती फॉलो कराव्या लागतील. त्याआधारे संबंधित आधार कार्ड खरं आहे की बनावट आहे, हे समजून येईल.
>> अशी करा आधार कार्डची पडताळणी
> आधार कार्ड देणाऱ्या UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर क्लिक करा.
> My Aadhaar पर्यायावर क्लिक करा.
> यानंतर तुमच्यासमोर आधारशी संबंधित अनेक सेवांची यादी दिसेल
> येथे Verify an Aadhaha number वर क्लिक करा.
> या ठिकाणी 12 अंकी आधार क्रमांक नमूद करा.
> त्यानंतर Captcha नमूद करा
> तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर नमूद करायचा असेल तर तुमच्या स्क्रिनवर पुढील पेज सुरू होईल
> आधार क्रमांक, वय, लिंग आणि राज्य आदी माहिती नमूद असेल तर तुमचे आधार कार्ड वैध आणि खरं आहे.
> माहिती नमूद नसेल तर तुमचे आधार कार्ड बनावट आहे