अवघ्या 12 रुपयांचा शेअर, पण निव्वळ नफ्यात 140 टक्क्यांची वाढ; तुम्हाला देणार का चांगला परतावा?
सध्या शेअर बाजारात या कंपनीची चांगलीच चर्चा होत आहे. गेल्या काही महिन्यांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चांगलेर रिटर्न्स दिले आहेत.
Penny Stock: लहान मुलांची खेळणी तयार करणाऱ्या एका कंपनीची सध्या सगळीकडे चर्चा आहे. ही कंपनी गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देत आहे. या कंपनीचे नाव ओके प्ले इंडिया (OK Play) आहे. गेल्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये (Share Market) 13 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. दोन वर्षांच्या गुंतवणुकीत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 306 टक्क्यांनी मल्टिबॅगर रिटर्न्स दिले आहेत. या कंपनीच्या शेअरचे मूल्य शुक्रवारी 12.05 रुपये होते. ही कंपनी 34 वर्षे जुनी असून या वर्षाच्या मार्च महिन्यात विक्वीटी शेअर्सचे विभाजन करण्याची घोषणा केली होती. मुंबई शेअर बाजाराच्या (BSE) संकेतस्थळानुसार या कंपनीच्या बोर्डाने 10:1 या प्रमाणात कंपनीच्या शेअरच्या (Stock Price) सब-डिव्हीजनला मंजुरी दिली आहे.
कंपनीचा तिमाही निकाल काय आहे?
नुकतेच या कंपनीने 2024-25 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीच्या निकालानुसार ओके प्ले या कंपनीचा निव्वळ नफा 140 टक्क्यांनी वाढून 0.87 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षाच्याच याच तिमाहीत या कंपनीचा निव्वळ नफा 0.36 कोटी रुपये होता. जून तिमाहीत विक्रीमध्ये 8 टक्क्यांची घट झाली असून 39.81 कोटींपर्यंत खाली आली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये याच तिमाहीत ही वक्री 43.25 कोटी रुपये होती.
कंपनीची उलाढाल किती आहे?
ओके प्ले या कंपनीची स्थापना 1990 साली करण्यात आली. हा एक मायक्रोकॅप स्टॉक आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 342.82 कोटी रुपये आहे. बीएसई नुसार ओके प्ले शेअरचे 52 आठवड्यांतील सर्वाधिक मूल्य 21.50 रुपये तर 52 आठवड्यांतील किमान मूल्य 9.70 रुपये आहे. या कंपनीचे 44.82 टक्के शेअर्स हे प्रमोटर्सकडे आहेत. तर 36.13 टक्के शेअर्स असंस्थात्मक गुंतवणूकदारांकडे आहेत. या कंपनीत एफआयआय गुंतवणूकदारांचे प्रमाण 19 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
आयपीओंचा धमाका! या आठवड्यात येणार एकूण 4 नवे आयपीओ; पैसे घेऊन राहा तयार
रक्षाबंधन सणाला बँका बंद असणार की चालू राहणार? जाणून घ्या नेमकं सत्य काय?
काय सांगता! हा शेअर तुम्हाला करणार मालामाल? एका वर्षात 190 टक्क्यांनी दिलेत रिटर्न्स