एक्स्प्लोर

काय सांगता! हा शेअर तुम्हाला करणार मालामाल? एका वर्षात 190 टक्क्यांनी दिलेत रिटर्न्स

सध्या शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी चांगल्या स्टॉक्सचा शोध घेत आहेत.

Stock to Buy: अमेरिकेतील मंदीचे सावट सध्या कमी झाले आहे. त्याचाच परिणाम शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारावर दिसून आला. शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली. सप्टेंबर महिन्यात अमेरिकेची मध्यवर्ती फेडरल बँक व्याजदरात घट करण्याची शक्यता आहे, त्याचेही परिणाम भांडवली बजारावर पडत आहेत. या अशा एकंदरीत जगातिक आणि राष्ट्रीय घडामोडींचा आधार घेत  ब्रोकरेज हाउस एसबीआय सिक्योरिटीजने (SBI Securities) टाइम टेक्नोप्लास्ट (TIME TECHNOPLAST) या कंपनीचे शेअर अखरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीने गेल्या एका वर्षात साधारण 110 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.  

टाईम टेक्नोप्लास्ट शेअरची सध्या स्थिती काय? (Time Technoplast Share Price Target)

ब्रोकिंग फर्म SBI सिक्योरिटीजच्या म्हणण्यानुसार आगामी काळात टाईम टेक्नोप्लास्ट या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ  होण्याची शक्यता आहे. वित्त वर्ष 2024 साली या कंपनीचे व्हॉल्यूम ग्रोथ रेट 19 टक्के राहिला. जून 2024 पर्यंत या कंपनीला PE पाईप आणि कंपोझिट लिंडरच्या क्रमश: 200 कोटी आणि 175 कोटी रुपयांच्या ऑडर्स मिळाल्या होत्या.

आर्थिक वर्ष 2024 मध्ये या कंपनीच्या CNG कम्पोझिट सिलिंडर्सच्या विक्रीत 100 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.एसबीआय सिक्योरिटीज या ब्रोकरेज संस्थेच्या मते सध्या या कंपनीचे अर्थकारण चांगल्या स्थितीत आहेत. या कंपनीने Time Technoplast या कंपनीच्या शेअर्सबाबत आगामी 12 महिन्यांचा विचार करून अंदाज बांधले आहेत. आगामी 12 महिन्यांसाठी कंपनीने या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत, असे एसबीआय सिक्योरिटीजने सुचवले आहे. त्यासाठी टार्गेट प्राईज 464 रुपये प्रतिशेअर ठेवण्याचे सूचवले आहे. 16 ऑगस्ट 2024 रोजी हा शेअर 0.65 टक्क्यांनी वाढून तो 385 रुपयांवर स्थिरावला. आगामी काळात या कंपनीच्या शेअरचे मूल्य 20 टक्क्यांनी वाढू शकते, असा एसबीआय सिक्योरिटीजचा दावा आहे. 

टाईम टक्नोप्लास्ट ही कंपनी पॉलिमर आणि कम्पोझिट उत्पादनांच्या अग्रणी कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. या कंपनीकडून ड्रम, कंटेनर आणि ऑटो कम्पोनन्ट्स तसेच HDPE पाइप्सचाही समावेश आहे. 

टाईम टेक्नोप्लास्ट शेअरचा इतिहास काय? (Time Technoplast Share History)

Time Technoplast या कंपनीच्या शेअरचे गेल्या 52 आठवड्यांतील सर्वाधिक मूल्य 394.40 रुपये आणि सर्वांत कमी मूल्य 130.20 रुपये आहे. या कंपनीचे भांडवली मूल्य 8,736.77 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरने एका आठवड्यात 17 टक्के, 3 महिन्यांत 34 टक्के आणि 6 महिन्यांत 79 टक्के रिटर्न्स दिलेले आहेत. चालू वर्षात हा शेअर 108 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या एका वर्षात हा शेअर 190 टक्यांनी तर दोन वर्षांत 281 टक्क्यांनी वाढला आहे. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

आयपीओंचा धमाका! या आठवड्यात येणार एकूण 4 नवे आयपीओ; पैसे घेऊन राहा तयार

रक्षाबंधन सणाला बँका बंद असणार की चालू राहणार? जाणून घ्या नेमकं सत्य काय?

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
Embed widget